कांचनवाडी येथे मतदार नोंदणी शिबिर

छत्रपती संभाजीनगर,११ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था कांचनवाडी आणि शिवछत्रपती महाविद्यालय सिडको येथे गुरुवारी (दि.10) नव मतदार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले.

अध्यक्षस्थानी प्रशासकीय अधिकारी डॉ.श्रीकांत देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी तथा 108 पश्चिमच्या मतदार नोंदणी अधिकारी श्रीमती अर्चना खेतमाळीस, प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे,तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी श्रीमती सोनाली जोंधळे, स्विप समन्वयक मनोज बोरुडे उपस्थित होते.

देवेंद्र कटके यांनी विद्यार्थ्यांना मतदानाच्या अधिकारासंदर्भात मार्गदर्शन केले व voter Helpline app द्वारे नवमतदारांना नाव नोंदणी करण्याबाबत आवाहन केले. शिबिरात 360 विद्यार्थ्यांची प्राथमिक स्वरूपात नावनोंदणी झाली. शिबिरास नवमतदारांनी उत्तम प्रतिसाद दिला.