‘माझी माती माझा देश’ उपक्रमांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयात पंचप्रण शपथ

छत्रपती संभाजीनगर,९ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमाचा सांगता सोहळा ९ ऑगस्ट पासून सुरु झाला आहे. यानिमित्त केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आयोजित ‘माझी माती माझा देश’ (मेरी माटी मेरा देश) उपक्रमांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांच्या उपस्थितीत पंचप्रण शपथ घेण्यात आली.

पंचप्रण शपथ

            ‘आम्ही शपथ घेतो की, भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करु. गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करु. देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करु. भारताची एकात्मता बलशाली करु आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू. देशाचे नागरीक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करु.’

            या उपक्रमात उपायुक्त जगदीश मिनियार यांच्यासह विविध शाखांचे अधिकारी तसेच कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले.

‘माझी माती माझा देश’ जिल्ह्यात शासकीय कार्यालयांमध्ये ‘पंचप्राण शपथ’

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘माझी माती माझा देश’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरुवात आज जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये ‘पंचप्राण शपथ’ घेऊन करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालय

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी आज सकाळी 10 वाजता पंचप्राण शपथ घेतली. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तहसिलदार तेजस्विनी जाधव यांनी ही शपथ वाचून दाखविली. उपस्थितांनी त्यांच्या पाठोपाठ शपथ उच्चारण केले.

अशी होती शपथ

  ‘आम्ही शपथ घेतो की,भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू,गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करु,देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करु,भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करण्यांप्रती सन्मान बाळगू,देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू”! 

जिल्हा परिषद

जिल्हा परिषदेच्या वेरुळ सभागृहात पंचप्रण शपथ घेण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुनील भोकरे यांच्या उपस्थितीत शपथ वाचन झाले. शिक्षणाधिकारी (योजना) अरुणा भुमकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ सुरेखा माने,बांधकाम विभागाचे प्रभारी अभियंता चौधरी, विरगावकर तसेच सर्व अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शासकीय विभागीय ग्रंथालय

भारतीय सैन्य दलात काम करण्याची संधी मिळणे हे आंनददायी असुन देशसंरक्षणासाठी प्राणपणाला लावून देशसेवेचे काम आम्हा सर्वांना सर्वोत्तम अभिमान आहे. ग्रंथ आणि पुस्तकातून योद्धांचे स्मरण चिरकाळ राहते. असे प्रतिपादन भारतीय सैन्य दलाचे निवृत्त अधिकारी अशोक हंगे यांनी केले.

शासकीय विभागीय ग्रंथालय येथे माझी माती माझा देश या अभियानाअंतर्गत आयोजित स्वातंत्र्य लढा विषयीच्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गोरखा रेजिमेंटचे सैनिक अशोक पेरकर, निवृत्त्‍ पोलीस निरीक्षक रमेश अतनुरे, सहायक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे, यांची उपस्थिती होती.

माझी माती माझी देशअंतर्गत

संचालक व जिल्हा माहिती कार्यालयात पंचप्रण शपथ

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळा 9 ऑगस्ट 2023 पासून सुरु होत आहे. या सांगता सोहळ्यानिमित्त राज्यात ‘ मेरी माटी मेरा देश ‘ हा उपक्रम केंद्र शासनाच्या सूचनेनुसार साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत “पंचप्रण शपथ” हा कार्यक्रम येथील संचालक माहिती कार्यालयात आज सकाळी 10 वाजता घेण्यात आला.

यावेळी सहायक संचालक गणेश फुंदे, माहिती अधिकारी मीरा ढास यांनी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना पंचप्राण शपथ दिली. यावेळी संचालक माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि माहिती केद्रांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.