आरोग्यविषयक जनजागृती निर्माण होण्याची गरज- लता मुळे

छत्रपती संभाजीनगर,९ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, दंत महाविद्यालय व रुग्णालय आणि इनरव्हील क्लब, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रेयनगर येथील श्रेयस बालक मंदिर आणि माध्यमिक विद्यालय येथे “भव्य दंत, रोगनिदान तपासणी व उपचार महाशिबीर” आयोजित करण्यात आले होते.  शिबिराचे उद्घाटन श्रेयस शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्षा सुषमा मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून इनरव्हील क्लब, छत्रपती संभाजीनगर अध्यक्षा डॉ. इना नाथ, प्रोजेक्ट मॅनेजर लता मुळे आणि डॉ. श्रीकांत देशमुख होते.
          यावेळी लता मुळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांचे आरोग्य राहणीमान उंचावण्याच्या उद्देशाने प्रत्येक गरिब व गरजू रुग्णांना आरोग्य सुविधा मिळाल्याच पाहिजेत व विशेष म्हणजे गरजू  विद्यार्थ्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा इनरव्हील क्लब, छत्रपती संभाजीनगरचा निर्धार आहे. विद्यार्थ्यांना निरोगी आणि सशक्त जीवन जगता यावे, म्ह्णून अशा प्रकारचे महाआरोग्य शिबीर सात्यताने आयोजित करण्यात येत आहेत. काही विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे औषध उपचार वेळेवर मिळत नाहीत म्हंणून आम्ही दंत, रोगनिदान तपासणी आणि उपचार शिबीर घेत आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांना स्वतःला विकार असून देखील तपासणी करण्यासाठी दवाखान्यात जाता येत नाही. अशावेळी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन सामाजिक चळवळ निर्माण आणि  जनजागृती करून त्या रुग्णांची तपासणी करणे गरजेचे असते तरच त्या रुग्णांना पुढील आवश्यक उपचार वेळेवर मिळू शकतात. शिबीरात  CSMSS येथील तज्ञ डॉक्टरांमार्फत जवळपास ७५८ विद्यार्थ्यांची मोफत दंत आणि आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच पथनाट्याद्वारे दातांची काळजी, निगा आणि व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत जनजागृती करण्यात आली.
शिबिराच्या निमित्ताने इनरव्हील क्लब, छत्रपती संभाजीनगरच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी १० चटई भेट म्हणून देण्यात आल्यात. यावेळी मुख्याधिपिका शैला धुमाळ, श्वेता पवार, इनरव्हील क्लब, औरंगाबाद सचिव विजया नानकर, एडिटर हिरा पेरे पाटील, श्यामल भोगले, वृषाली उपाध्ये, आशा भांड, माधुरी अहिरराव, रेखा केदारे, सुनंदा पाटील, मंगल चव्हाण, किरण पाटील, उषा सूर्यवंशी, शुभांगी वैद्य, डॉ. नरेश निंबाळकर, डॉ. नवीन शाहू, डॉ. कुशल शिंदे, डॉ. शुभेन्द्र खांडेवाले, डॉ. अर्चना चिकटे, डॉ. स्नेहल पवार, डॉ. प्रिया बुलबुले आणि श्रेयस बालक मंदिर आणि माध्यमिक विद्यालयाची शिक्षक, विभागप्रमुख आणि विद्यार्थी मोट्या संख्येने उपस्थित होते.