​मणिपूर हिंसाचाराविरोधात भाकपचे पुन्हा मुसळधार पावसात निदर्शने   

छत्रपती संभाजीनगर,३१ जुलै /प्रतिनिधी :-आम्ही दंगलग्रस्त म​णिपूरच्या नागरीकांसोबत, अशी  हाक देत भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे   ​म​णिपूरमधील दंगलखोर व बलात्का​ऱ्यांवर  कारवाई करा या मागणीसाठी देशव्यापी आंदोलनाचा भाग ​म्हणून  पैठणगेट​ येथे ​सोमवारी भर पावसात जोरदार निदर्शने करण्यात आली.                               

लोक संपुर्ण आयुष्यभर कष्ट करुन एक घर बनवतात आणि जातीयवादी दंगली घडवुन क्षणात नष्ट केले जातात, ​म​णिपूर मधील भाजपा सरकार नागरिकांच्या मालमत्तेचे आणि म​हिलांच्या अब्रुचे रक्षण करण्यात अपयशी ठरले आहे.म​णिपूरमध्ये दंगली घडवुन शेकडो घरे, चर्च जाळण्यात आले , सरकारी आकडयानुसार ​५०६४८ लोक बेघर झाले आहेत, वास्तविक आकडा यापेक्षा मोठा आहे.राज्य सरकार व केंद्र सरकार या दंगलीवर नियंञण ​आणण्यात  अपयशी ठरली, प्रधानमंत्र्यांनी ​म​णिपूरला भेटही दिली नाही, मौन बाळगले ,सर्वोच्च न्यायालयाने दखल घेईपर्यंत शांततेचे आवाहनही केलेले नाही.भाजपा कायदा आणि सुव्यवस्था नव्हे तर अराजकता आणायची आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने शहरात प​त्रके वाटुन  विभाजन, तुष्टीकरण आणि अधिकारांच्या उल्लंघनाविरुद्धच्या लढ्यात एकत्र येण्याचे आवाहन शहरातील शांतताप्रेमी नाग​रिकांना केले होते.   

भाकपचे खासदार काॅम्रेड विनय विश्वम, खासदार काॅ संदोष कुमार , महिला फेडरेशनच्या काॅम्रेड अॅनी राजा यांनी ​म​णिपूरला जाऊन दंगलग्रस्तांची भेट घेतली, त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला , राज्यपालांना भेटुन दंगलखोरांना अटक करण्याची व दंगलग्रस्तांच्या पुनर्वसनाची  विनंती केली.  हा हिंसाचार विशेषतः ख्रिश्चन समुदायाविरुद्ध होता आणि आम्ही त्याविरोधात ठामपणे उभे राहत आहोत असेही भाकपने पत्रकात म्हटले होते. मणिपूरमधील अस्वीकार्य घटनांमुळे ख्रिश्चन समुदायाच्या वारशाने मिळालेल्या स्वातंत्र्याचे उल्लंघन झाले आहे, याबद्दल आम्हाला खेद वाटतो. असेही भाकपच्या पत्रकात म्हटले होते. आमचा विश्वास आहे की धार्मिक स्वातंत्र्य हा मानवी हक्कांचा एक महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग आहे आणि तो नेहमी परस्पर समंजसपणाने आणि सुसंवादाने राखला गेला पाहिजे.
ख्रिश्चन समुदायाचा ​किंवा  कोणत्याही समाजाचा अपमान करणे, त्यांची संपत्ती नष्ट करणे आणि  दहशत माजवणे हे आपल्या सामाजिक आणि न्यायिक मूल्यांच्या विरुद्ध आहे.  सर्व मानवांच्या समान हक्कांचे संरक्षण करण्याच्या बाजूने आम्ही आहोत आणि अशा हिंसाचाराच्या विरोधात आपण सतर्क राहण्याचेही आवाहन केले होते.  हा हिंसाचार सर्व अल्पसंख्यांक मग ते ​मुस्लिम , खिश्चन, शिख, जैन, पारशी इत्यादि विरोधात ​असू शकतो, असतोही. याविरुद्ध सर्व अल्पसंख्यांकांनी व जागरुक हिदुंनीही ​एकत्र  यावे असे आवाहन केले होते.  त्याप्रमाणे मोठ्या संख्येने पैठणगेट येथे ​नागरिक  जमा झाले व त्यांनी पैठणगेट येथे मुसळधार पाऊस असतानाही जोरदार निदर्शने केली.

यावेळी बलात्कारियों की भाजपा सरकार नही चलेगी, भाजपा वालो शर्म करो, ​मणिपूर  की ​मां  बहनो हम तुम्हारे साथ है, नरेंद्र मोदी मुर्दाबाद , आरएसएस मुर्दाबाद, ​मणिपूरचे सरकार बर्खास्त करा, चर्च जलाना बंद करो, खिश्चनो के घर जलाना बंद करो, दंगेखोरोसे पुलीस की बंदुके वापस लो, अदाणी के लिए ​मणिपूर  जलाना बंद करो,हिंदु, ​मुस्लिम , बौद्ध, सिख, ईसाई, पारसी, जैन, ​लिंगायत , शिवधर्मी हम सब भाई भाई।    ​इत्यादी घोषणांनी मदर टेरेसा चौक दणाणला. ही निदर्शने ​२ तास चालले, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव काॅ राम बाहेती, काॅ अभय टाकसाळ, काॅ अमरजीत बाहेती, गजानन खंदारे, काॅ अनिता हिवराळे,  काॅ जॅक्सन ​फर्नांडिस यांची भाषणेही झाली. यावेळी निदर्शकांमध्ये सर्व धर्मा​चे  नागरिक होते, त्यांच्या हातात लक्षवेधी फलके होती. ​मणिपूरच्या नागरिकांसाठी आर्थिक मदत गोळा करण्याचा कृती कार्यक्रमही भाकपने जाहीर केला. यावेळी  अॅड अभय मनोहर टाकसाळ ( शहर सेक्रेटरी, भा.क.प.)  काॅ अनिता हिवराळे ( शहर सहसेक्रेटरी भा. क. प. ) काॅ विकास गायकवाड, काॅ.राजु हिवराळे, काॅ जफर फजलु रहमान खान, काॅ रफीक बक्श,कॉ.अमरजीत बाहेती, कॉ. मनीषा भोळे, कॉ.माधुरी जमधडे​ ,शेख इसाक, अमोल सरोदे, विशाल बोराडे, दादाभाई , नसीर लहरी,अतिश गवळे, शीला मुजमुळ​ ,रतन अंबिलवादे, चारुशीला जावळेयोगेश गरड, सत्यवान महापुरे, जाफर खान, शिलाबई दिवे, नीता बेलकर, शालुबाई कांबळे,  प्रधान शीला, अरुणा गायकवाड, शेर खान मस्तान खान,गजानन खंदारे ​,बाबूलाल रेतवाल, बारकू गोरख नलावडे , शेख शकील , मेहमूद बक्ष शेख अब्दुल्ला,  डॉ. शेख सलीम, शेख ख्वाजा , शारदा भालेराव ,रंजना बनसोडे , जया दाभाडे, कडूबाई बनसोडे , मंदाबाई नवगिरे , लक्ष्मीबाई भालेराव , सविता नरवडे, शोभा जाधव, रेखा धनगर,  कविता होर्शिलसविता नरवडे,  रेखा धनगर , सुकन्या प्रधान, विद्या नवचारे, कमलबाई कीर्तीशाही , दिपाली दाभाडे​, ज्योती नवतुरे, सय्यद अनिस इत्यादींचा सहभाग होता.