छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकला  महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडून  उत्कृष्ट  मानांकन

छत्रपती संभाजीनगर – कांचनवाडी  येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचा शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (M.S.B.T.E) मुंबईकडून उत्कृष्ट  दर्जा (Excellent Remark) देऊन गौरव करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, शंकाचे समाधान, निकालाची उज्ज्वल परंपरा, नामांकीत उद्योगांना भेटी, तज्ञ पाहुण्यांचे व्याखाने, सेमिनार यांचे नियमित आयोजन, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष लक्ष दिले जाते. या सर्व बाबींमुळे सर्व शाखांना उत्कृष्ट दर्जा देऊन M.S.B.T.E. चे संचालक डॉ. प्रमोद नाईक  व सचिव डॉ. महेंद्र चितलांगे यांनी लेटर ऑफ अँप्रीशिएशन देऊन गौरव करण्यात आला.यशाबाबत छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.रणजीत मुळे व सचिव श्री.पद्माकरराव मुळे यांनी सर्वांचे अभिनंदन करून भविष्यात विद्यार्थ्यांना उत्कृष्ट ज्ञानदानाचे कार्य सुरु राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
         तंत्रशिक्षण क्षेत्रात कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक खूप प्रगती करत आहे. विशेष बाब म्हणजे महाविद्यालयातील सर्व सहा कोर्सेसना उत्कृष्ट दर्जा   देऊन गौरविण्यात आले आहे. यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर  इंजिनिअरिंग व मेकँनिकल इंजिनिअरिंग यांना यापूर्वीच उत्कृष्ट दर्जा देऊन गौरविण्यात आले असून यावर्षी  इलेक्ट्रिकल  इंजिनिअरिंग, इलेट्रॉनिक्स  अँण्ड टेलीकॉम इंजिनिअरिंग सोबतच नवीन सुरु झालेल्या आर्टीफिसिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग यांना शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता उत्कृष्ट दर्जा देऊन गौरविण्यात आले. कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकमध्ये महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई व तंत्रशिक्षण संचालनालय यांच्या निर्देशानुसार वेगवेगळे उपक्रम यशस्वीपणे राबविले जातात व आधुनिक तंत्रज्ञानाची विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे ओळख व्हावी व त्याचे सखोल ज्ञान मिळावे. यासाठी महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील असते. उज्ज्वल निकालाच्या परंपरे सोबत नामांकित आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांमार्फत प्लेसमेन्ट केले जाते व त्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नोकरी उपलब्ध करून दिली जाते. दरवर्षी सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस मुलाखतीचे आयोजन केले जाते व याद्वारे विद्यार्थ्यांना नोकरी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये बजाज ऑटो लि., जॉन डियर इंडिया प्रा. लि., फोर्ब्स अँड कंपनी लि., मॅसो ऑटोमोटिव्हस प्रा.लि., व्हॅरॉक इंजिनीअरिंग प्रा.लि., गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन्स लि.  सारख्या नामांकित कंपन्यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सुमारे २.२५ लाखाहून अधिक वार्षिक पॅकेज दिले आहे. अशी माहिती कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे यांनी दिली आहे.
      कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकला मागील १४ वर्षाची यशस्वी परंपरा असून आजपर्यंत ४०० हुन अधिक विद्यार्थी विविध नामांकित उद्योगांमध्ये नोकरी करत आहेत. उच्च शिक्षित प्राध्यापकवृंद, आधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा प्रोयोगशाळा तसेच  बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य प्रशिक्षण व जास्तीत जास्त प्रात्यक्षिकांचा सराव करून घेतला जातो.असे प्रतिपादन 

सचिव श्री. पद्माकरराव  मुळे यांनी केले.                 या यशाबद्दल छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.रणजीत  मुळे, सचिव श्री. पद्माकरराव  मुळे, प्रशासकीय अधिकारी, डॉ. श्रीकांत देशमुख, प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे, उप-प्राचार्य प्रा. चंद्रशेखर राहणे, अकॅडेमिक इन्चार्ज  प्रा. कैलास तिडके, प्रा. हरिष रिंगे, प्रा. रुपाली पोफळे, प्रा. माधव नरंगले, प्रा. संदीप मदन, प्रा. सोनल बोराखडे, टी. पी. ओ. प्रा. सागर आव्हाळे,  प्रा. गिरिष सहाणे यांनी शुभेच्छा दिल्या. 


विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर

    प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य प्रकारे प्रशिक्षित करून तसेच व्यवसाय अथवा नोकरी मिळवून देण्यासाठी महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील असते. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक तसेच व्यक्तिमत्व विकास, सॉफ्टस्किल डेव्हलपमेंट, अभियोग्यता चाचणी अशा विविध चाचण्या घेण्यात आल्या असून हे विद्यार्थी सर्व टप्प्यांवर यशस्वी झाले आहेत.कॅम्पसमध्ये बसची व्यवस्था, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, कॅन्टीन, हॉस्पिटल, एटीएम, पोस्ट ऑफीस, मेडिकल  सुविधा उपलब्ध आहेत. कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचा उत्कृष्ट दर्जा देऊन गौरव करण्यात आला आहे. भविष्यातही अशीच वाटचाल सुरु राहील.  

रणजीत  मुळे

अध्यक्ष 

छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था

——————————————————–