आयुर्विमा महामंडळाची नोंदणी टळणार!

नवी दिल्ली,
कोरोना महामारीमुळे अवमूल्यन झाल्याने आयुर्विमा महामंडळाची शेअर बाजारातील नोंदणी आणि आयडीबीआय बँकेची हिस्साविक्री लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

निर्गुंतवणूक कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने आयुर्विमा महामंडळाची शेअर बाजारात पुन्हा नोंदणी करून 90 हजार कोटी आणि आयडीबीआय बँकेच्या समभागांची विक्री करून एकूण 2.10 लाख कोटी रुपये यंदाच्या आर्थिक वर्षात उभारण्याची योजना आखली आहे. कोरोना महामारीमुळे उद्भवलेली आर्थिक स्थिती पाहता, यंदाच्या आर्थिक वर्षात आयुर्विमा महामंडळाचे समभाग विकणे व्यवहार्य नाही, असे सूत्रांनी सांगितले. बाजाराची सध्याची स्थिती पाहता आयुर्विमा महामंडळाचे मोठ्या प्रमाणात विक्रीला येणारे समभाग खरेदी करण्याची क्षमता सध्या गुंतवणूकदारांमध्ये नसल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *