जानेवारी-मार्च तिमाहीत जीडीपी दर 3.1 टक्के

नवी दिल्ली, 
कोरोनाच्या पृष्ठभूमीवर आज केंद्र सरकारकडून जाहीर होणार्‍या जीडीपी आकडेवारीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जानेवारी ते मार्च या तिमाहीत जीडीपीचा विकासदर (जीडीपी) 3.1 टक्के राहिला. त्याआधी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत जीडीपी 4.1 टक्के (सुधारित) होता, तर 2019-20 या आर्थिक वर्षाचा विकासदर 4.2 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्याआधीच्या वर्षात तो 6.1 टक्के होता. विकासदराची गेल्या 11 वर्षातील नीचांकी कामगिरी आहे.

कोरोनाने अर्थव्यवस्थेला पुरते जखडून ठेवले आहे. देशात 25 मार्चपासून करोना रोखण्यासाठी लॉकडाउनचे सत्र सुरू आहे. सध्या चौथा लॉकडाउन सुरू असून तो 31 मे रोजी संपुष्टात येईल. मात्र या लॉकडाऊनच्या काळात जवळपास 12 कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. उद्योगधंद्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. सरकारने कोरोनाच्या संकटातून अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी 20 लाख कोटींचे आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत पॅकेज जाहीर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *