व्याजदरात होणार कपात; ‘या’ बँकांकडून कर्ज घेणे फायदेशीर

मुंबई,
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) धोरणात्मक व्याजदरात कपात केल्यानंतर आता अन्य तीन बँकांनीही रेपो आधारित कर्ज दरामध्ये कपात केली आहे. व्याज दरात कपात करणाऱ्या या बँकांमध्ये युको बँक, बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडियाचा समावेश आहे. युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियाने एक्टर्ननल बेंचमार्क लेन्डिंग रेट (ईबीएलआर) मध्ये 40 बेस पॉईंट म्हणजेच 0.40 टक्के घट केली आहे. त्याचवेळी बँक ऑफ इंडियाने व्याजदरात 0.25 टक्क्यांनी कपात केली आहे.
 
युनियन बँक ऑफ इंडियाचे नवीन दर आहेत
युनियन बँक ऑफ इंडियाने व्याजदरात 40 बेस पॉईंटने कपात केल्यानंतर नवीन दर 6.80 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. नवीन दर सोमवार 1 जून 2020 पासून अंमलात येणार असल्याची माहिती बँकेने दिली आहे. विविध योजनांचे प्रभावी दर उत्पादनाच्या ईबीएलआर अधिक प्रीमियम / सवलतीत असतील. रिझर्व्ह बॅंकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार किरकोळ आणि सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना असलेल्या नव्या दराच्या कर्जासाठी यूबीआय ईबीएलआर आधारित व्याज दर ऑफर करते.
 
यूको बँकेत डिपॉजिट रेट्समध्ये बदल नाही
युको बँकेद्वारा व्याजदरामध्ये कपात झाल्यानंतर नवीन दर 6.90 टक्के करण्यात आला आहे. यानंतर आता किरकोळ आणि एमएसएमई कर्ज 0.40 टक्के स्वस्त झाले आहे. परंतु, ठेवींच्या दरात बदल करण्याबाबत बँकेने कोणतीही माहिती दिली नाही. मार्चपासून आतापर्यंत 15,000 कोटी रुपयांच्या कर्जासाठी मान्यता देण्यात आली असून यातील 12000 कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती युको बँकेने दिली आहे. त्याचा फायदा 1.36 लाख ग्राहकांना झाला आहे. बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.
 
याशिवाय बँक ऑफ इंडियानेही एमसीएलआरमध्ये 0.25 टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. बीओआयच्या या चरणानंतर आता गृहकर्ज ऑटो लोन आणि एमएसएमई यांना देण्यात आलेली सर्व प्रकारची कर्जे स्वस्त झाली आहेत. हे नवीन दर 1 जूनपासून लागू होतील. बँकेचे नवीन व्याज दर लागू झाल्यानंतर एका वर्षाच्या कर्जावरील वार्षिक व्याज दर कमी करून 7.70 टक्के केले जाईल. हे सध्या 7.95 टक्के आहे. त्याचप्रमाणे सहा महिन्यांच्या मुदतीच्या कर्जाचा व्याज दर 7.60 टक्के असेल तर मासिक कर्जाचा व्याज दर 7.50 टक्के राहील.
 

Leave a Reply

Your email address will not be published.