शासकीय कार्यालयांसह व्यापारी प्रतिष्ठाने व सार्वजनिक ठिकाणी वापरण्यासाठी पैंडल सॅनिटायझर मशिन उपयुक्त

जालन्यातील शक्ती इंजिनिअर्स कंपनीच्या उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतूक

जालना : कोरोना या संसर्गजन्य आजाराचा धोका लक्षात घेऊन येथील शक्ती इंजिनिअर्स या कंपनीने सर्वांनाच उपयुक्त ठरेल, असे पैंडल सॅनिटायझर मशीन बाजारात आणले आहे. सर्वांनासाठीच अत्यंत उपयुक्त ठरत असलेल्या मशिनचे मान्यवरांनी तोंडभरुन कौतूक करत स्वत:सह इतरांच्या सुरक्षेसाठी सदर मशिन हे निश्‍चितच उपयुक्त ठरणार असल्याने शक्ती इंजिनिअर्स कंपनीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, अशा भावनाही व्यक्त केल्या आहेत.

जालना येथील नवीन औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या शक्ती इंजिनिअर्स कंपनीचे ज्येष्ठ संचालक अर्जुन गेही त्यांचे सुपूत्र अभियंता अक्षय गेही यांच्या कल्पनेतून साकारलेले हे मशिन  सार्वजनिक ठिकाणांसह व्यावसायिक प्रतिष्ठाने, शासकीय- निमशासकीय कार्यालयांना देखील प्रचंड उपयुक्त ठरणारे आहे. कंपनीचे ज्येष्ठ संचालक अर्जुन गेही यांचे सुपूत्र अक्षय गेही यांनी नुकतीच मुंबई विद्यापीठातून बीई ही पदवी संपादन करुन त्यांनी नुकताच कंपनीचा कार्यभार स्वीकारला आहे. गेले दोन ते अडीच महिने लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगांना उतरती कळा आली आहे. परंतू शक्ती इंजिनिअर्स कंपनीने स्वस्थ न बसता कोरोना या आजाराचा धोका लक्षात घेऊन सर्वांनाच उपयोगी पडेल, अशा प्रकारचे  पैंेडल्सचा वापर करून एक हात स्वच्छ करणारे मशीन शोधून काढले आहे. या स्टँड-अलोन मशीनद्वारे, व्यक्ती त्याच्या पायाने पैंडल दाबू शकते आणि आवश्यकतेनुसार सॅनिटायझर हातात घेऊ शकते. यासाठी दुकाने किंवा कार्यालयांमध्ये स्वतंत्रपणे एखाद्याची नेमणूक करण्याची गरज नाही.

या संदर्भात अधिक माहिती देतांना अक्षय गेही म्हणाले की, सोयीस्कर तंत्रज्ञान ही आता काळाची गरज आहे. आमच्या उत्पादनाची मागणी केवळ जालना शहरातच नाही तर संपूर्ण मराठवाड्यात होत आहे. ते म्हणाले की, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी मशीनचे केवळ कौतुकच केले नाही तर ते त्यांच्या कार्यालयात बसवले आहे.

याशिवाय केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनीही आपल्या कार्यालयांच्या मुख्य गेटवर ती बसविली आहेत. त्यामुळे या यंत्राचा प्रत्येकालाच लाभ मिळत आहे.  आपल्याबरोबरच इतरांनाही सुरक्षा देणार्‍या मशिनचे अनेकांकडून कौतूक होत असल्याचेही श्री. गेही यांनी यावेळी सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published.