नव्या दमाने उभा राहणार ;सोडून गेलेल्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता – शरद पवार

काकांचा सर्व चर्चांना फुलस्टॉप! आता ऑन ग्राऊंड राजकीय खेळीला सुरुवात करणार

पुणे,​२जुलै ​/ प्रतिनिधी :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याच्या चर्चांना खुद्द शरद पवार यांनीच पुर्णविराम दिला आहे. अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला ही माहिती आम्हाला तुमच्याकडून मिळाली. कारण आमच्याकडे राजीनामा दिलेला नाही, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला आहे. अजित पवार यांच्या शपथविधीनंतर पहिली प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष आहे, असं म्हटलं आहे. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारची रँक याचा उल्लेख केला आणि त्याबरोबर इरिगेशनमध्ये जी काही तक्रार होती त्यासंबंधीचा उल्लेख केला. मला आनंद आहे, आज त्यांनी राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांना शपथ दिली. म्हणजे मोदींनी केलेले आरोप हे वास्तव नव्हते. या आरोपातून या सर्वांना मुक्त केले, या बद्दल पंतप्रधानांचा आभारी आहे, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती मी केली आहे. त्यांनी च्याची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नाही, असं सांगत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. तसंच सुनिल तटकरे यांनी देखील जबाबदारी पार पाडली नसून त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल. असं पवार म्हणाले. यावेळी त्यांनी मी पक्षाचा अध्यक्ष असून यापुढे पक्ष वाढवण्यासाठी दौरे करणार असल्याचही त्यांनी याववेळी सांगितलं.

राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतले नेत्यांनी अजित पवार यांच्यासोबत शपथ घेतली. यावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, एकेकाळी माझ्यासोबत 56 आमदार होते. त्यापैकी 50 जण मला सोडून गेले. एका क्षणात मी फक्त सहा आमदारांचा नेता झालो. त्यानंतर मी महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचलो, माझी भूमिका मांडली. त्यानंतर झालेल्या निडणूकीत सोडून गेलेल्या आमदारांपैकी चार ते पाच जणचं निवडून आले, बाकीचे सगळे पडले. आताही मला सोडून गेलेल्यांची चिंता नाही. जे सोडून गेले त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता आहे, असं पवार यावेळी म्हणाले.

‘या सहकाऱ्यांनी जी पक्षाची भूमिका आहे त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. उद्याच्या सहा तारखेला मी राज्यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलविली होती. पण, यापूर्वीच काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि आम्हीच पक्ष आहोत असे म्हणत शपथ घेतलेली आहे. ज्यांची नावे आली त्यापैकी काही लोकांनी मला फोन करून आमची सही घेतली, पण आमची भूमिका वेगळी आहे, असे सांगितले आहे. मी आत्ताच काही बोलू इच्छित नाही. याचे स्वच्छ चित्र माझ्याएवढेच जनतेसमोर मांडण्याची अपेक्षा आहे, तसे त्यांनी केले तर माझा विश्वास बसेल, असंही पवार म्हणाले.

त्याचवेळी त्यांनी उद्यापासून यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर दर्शन घेऊन जनमानसात जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार असल्याची घोषणा केली आणि जनमानसात जाऊन राष्ट्रवादी पक्ष पुन्हा उभा करणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच प्रफुल्ल पटेल यांचे नाव घेत पक्षाची शिस्त मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा, इशारा त्यांनी दिला.