ही सगळी भाजपचीच खेळी -राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार

दोन मिनिटांत पवारांनी खोटून काढला अजित पवारांचा मुद्दा!

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्य खोडून काढण्यासाठी थेट शरद पवारांना पत्रकार परिषद घ्यावी लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नाट्यावर कुठेही तूर्त भाजपची भूमिका दिसत नाही. जेव्हा दिसेल त्यावेळी बोलू, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. त्यावर थेट पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ही सगळी भाजपचीच खेळी असल्याचे नाव न घेता सांगितले.

Image


“काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सोडली तर उरलेला पक्ष कोण यामुळे हे सरळ स्पष्ट आहे”, असेही शरद पवार म्हणाले. हे सगळं सांगायची गरज नाही. यासाठी आसाममध्ये असलेले लोकं इथं येऊन सांगण्याची गरज लादणार नाहीत. बंडखोरांना विधान सभेच्या प्रांगणातच यावे लागेल, असा थेट इशाराच शरद पवार यांनी दिला आहे. हिंदूत्वाच्या मुद्द्यावर प्रश्न विचारल्यावर शरद पवारांनी शिंदेंना प्रतिप्रश्न केला आहे.

Image

इतके दिवस काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत असताना हिंदूत्वाचा मुद्दा का आठवला नाही. अडीच वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांना ही गोष्ट का आठवली असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला आहे. तसेच बंडखोर आमदारांना आपल्या मतदारांना मतदार संघात येऊन तोंड द्यायचे आहे, असाही इशारा त्यांनीच दिला आहे. महाराष्ट्रातील सुरू असलेल्या राजकीय भूकंप परिस्थितीबद्दल पवारांनी थेट वक्तव्य केले आहे. एरव्ही हा शिवसेनेचा अंतर्गत विषय असल्याचे सांगणाऱ्या पवारांनी आता थेट एकनाथ शिंदे गटाला आव्हान केले आहे.

एकनाथ शिंदेंच्या हातीच शिंदेगटाचं भविष्य! 

आमदारांना डांबून ठेवलं आहे, त्यांच्यावर जोर जबरदस्ती केली जात असल्याची टीका करणाऱ्या संजय राऊतांना एकनाथ शिंदेंना व्हीडिओच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. शिंदेंनी आमदारांची बैठक बोलावली होती. त्याचे चित्रीकरणच सर्वांना पाठवून देण्यात आले आहे. एकनाथ शिंदेंनी या सगळ्या आमदारांचं नेतृतत्व करावे, अशीही भूमिका आमदारांनी मांडली आहे. हे या चित्रफितीत स्पष्ट ऐकू येत आहे.