चातुर्मासासाठी साध्वीचे वैजापुरात आगमन ; जैन धर्मीयांसाठी धार्मिक आनंदाची पर्वणी

शहरातून शोभायात्रा काढून साध्वीचे स्वागत 

वैजापूर ,​१ जुलै ​/ प्रतिनिधी :-

जैन बांधवांच्या चातुर्मासासाठी साध्वी किरणसुधाजी महाराज यांच्या शिष्या साध्वी अनुप्रेक्षाजी, साध्वी श्रुती प्रभाजी, साध्वी ऋजुप्रभाजी यांचे शुक्रवारी (ता.30) वैजापुरात आगमन झाले. शहरातील सकल  जैन बांधवांनी शोभायात्रा काढून त्यांचे स्वागत केले.

स्व.बन्सीलालजी संचेती जैन स्थानकात रोज सकाळी 9 ते 10 यावेळेत त्यांचे प्रवचन होणार आहे. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी समितीचे गठन करण्यात आले असून या समितीमध्ये जीवनलाल संचेती, रवींद्र संचेती, शोभचंद संचेती, चातुर्मास समितीचे अध्यक्ष हेमंत संचेती, उपाध्यक्ष प्रकाश बोथरा, कोषाध्यक्ष रुपेशकुमार संचेती, नियोजन समितीचे राजेंद्र पारख, प्रचार-प्रसार समितीचे निलेश पारख, परागकुमार छाजेड, आहार- विहार समितीचे अशोक संचेती, शैलेशकुमार संचेती, प्रकाश हिरण आदींचा समावेश आहे.

साध्वीच्या दर्शनासाठी लोणार व नारायणगाव येथून आलेल्या अतिथींचे स्वागत व सत्कार वैजापूर श्रीसंघाचे जीवनलाल संचेती, रतीलाल संचेती व बाबूलाल संचेती यांनी केले. शोभायात्रेत मर्चंट बँकेचे अध्यक्ष विशाल संचेती, मेजर सुभाष संचेती, राजेंद्र पारख, इंदरचंद बोथरा, गौतमचंद संचेती, डॉ.संतोष गंगवाल, प्रा.जवाहर कोठारी, उमेश संचेती, संतोष कासलीवाल, नंदलाल मुगदीया, अनिल संचेती, विजय कासलीवाल, पारसमल बोथरा, प्रवीण संचेती, विनोद छाजेड यांच्यासह जैन समाजबांधव मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.

जैन धर्मीयांसाठी आनंदाची पर्वणी

जैन धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र मानला जाणारा चातुर्मास या वर्षी अधिकमास आणि त्यातही अधिक श्रावण महिना असल्याने अत्यंत महत्त्वाचा समजला जात आहे. आणि त्यातही यावर्षी दुग्धशर्करा योग म्हणजे या चातुर्मासात जैन धर्माचे 24 वे तीर्थकर भगवान महावीर स्वामी यांचे 2550 वे निर्वाण वर्ष 12 नोव्हेंबर रोजी सुरू होत आहे. 

या वर्षी अधिक श्रावण मास असल्याने चातुर्मासाचा अवधी 149 दिवसांचा असणार आहे. दरवर्षी हा कालावधी 120 दिवसांचा असतो. तब्बल 19 वर्षानंतर अधिक श्रावण  चातुर्मासमध्ये आलेला आहे. यामुळे श्रावण महिना 59 दिवसांचा असणार आहे. 

या निमित्त अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन येथील जैन धर्मियांनी विविध स्वरूपात केले आहे. यावर्षी अधिकमास 18 जुलै ते 16 ऑगस्ट या दरम्यान असणार आहे. तर चातुर्मास 2 जुलै ते 27 नोव्हेंबर या काळात आयोजित केला जाणार आहे. 

सकल जैन बांधवांनी या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मेजर सुभाष संचेती यांनी केले आहे.