वैजापूर – गंगापूर तालुक्यात गारपीट व पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची आ.रमेश पाटील बोरणारे यांच्याकडून पाहणी

Displaying IMG-20211231-WA0140.jpg

वैजापूर,३१ डिसेंबर /प्रतिनिधी :-वैजापूर व गंगापूर तालुक्यातील बाजाठाण, नागमठाण, शनी देवगाव, चेंडूफळ, पीरवाडी, नेवरगाव-हैबतपुर या गावांमध्ये मंगळवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस व गारपीठ होऊन रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले.शिवसेना आमदार प्रा.रमेश पाटील बोरनारे व जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे  यांनी तहसीलदार श्री.वाणी व तालुका कृषि अधिकारी श्री.आढाव यांच्यासह शुक्रवारी या गावांना भेट देऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.  

अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.गहू, रब्बी ज्वारी, हरभरा, कांदा, ऊस आदी पिकांना व तसेच द्राक्षे, मोसंबी, केळी व डाळिंब या फळबागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. हरभरा व गव्हाच्या पिकांचे अतोनात नुकसानीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

शेतकऱ्यांना या पिकाच्या नुकसानीचा मोबदला मिळावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत असल्याने आमदार बोरणारे यांनी तहसीलदार वाणी व कृषी अधिकारी आढाव यांच्यासह या गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना धीर देत नुकसानीचा अहवाल तयार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या तसेच पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले.

Displaying IMG-20211231-WA0144.jpg

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके,उपतालुकाप्रमुख कल्याण पाटील जगताप, सिताराम पाटील भराडे, युवासेना जिल्हासरचिटणीस पांडूरंग पाटील कापे, विभागप्रमुख भिमाशंकर तांबे, प्रविण वालतूरे, सरपंच सुभाष पाटील भराडे, अशोक पाटील भराडे, चेअरमन गोरक्षनाथ पाटील भराडे, सरपंच संजय पा मेघळे, बाळासाहेब पाटील मेघळे, बाबासाहेब मेघळे, भाऊसाहेब मेघळे, नारायण  मेघळे, भारत बान्द्रे, राहुल पटारे, प्रविण मेघळे, सुकदेव पवार, नंदु नारायण मेघळे, बाळासाहेब दळे, सोपान दळे, विष्णू भराडे, रघुनाथ भराडे, वामन भराडे, संजय भराडे, प्रकाश मिसाळ, प्रदीप साळुंके यांच्यासह या भागातील  नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.