प्रख्यात गायक प्रमोद सरकटे व स्वराज सरकटे यांचा “जय हरी विठ्ठल” भक्ती संगीत आषाढी महोत्सव २९ जून रोजी

छत्रपती संभाजीनगर,२४ जून / प्रतिनिधी :- आषाढी एकादशी निमित्त प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी स्वरराज प्रस्तुत प्रसिद्ध गायक प्रमोद सरकटे आणि युवा गायक स्वराज सरकटे यांच्या “जय हरी विठ्ठल” या आषाढी महोत्सवाचे गुरुवारी २९ जून  रोजी एमजीएम रुक्मिणी नाट्यगृहात आयोजन करण्यात आले आहे.

प्रमोद सरकटे


जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल आणि जय जय राम कृष्ण हरी नामघोषाने प्रचंड संख्येने उपस्थित रसिक ठेका धरत तल्लीन होतअसतात.. स्वरराज चे निर्माता आणि प्रसिद्ध गायक संगीतकार प्रमोद सरकटे मराठवाड्याचा युवा गायक स्वराज सरकटे यांच्या दमदार पणे सादर केलेल्या भक्तिगीतांस रसिक मोठा प्रतिसाद देत असतात ..
आणि पंढरीची अनुभुती घेत रसिक आषाढी महोत्सव एका वेगळ्या उंचीवर नेत असतात.

स्वराज सरकटे


अनेक सेलेब्रिटी गायिकांचा पण या महोत्सवात दरवर्षी सहभाग असतो.रसिकांना एक वेगळी पर्वणी ,भक्तिगीते, अभंग,गौळण,उपशास्त्रीय संगीतावर आधारित गीते रसिकांनी मोठा प्रतिसाद देत शास्त्रीय संगीतात त्यांची असलेली आवड टाळ्यांच्या, आणि वन्समोरच्या माध्यमातून व्यक्त होत असते..निमंत्रित निवेदक भक्तीरसातील विविध पैलू आणि प्रत्येक गीताला समरस अशी शब्दांची जोड आणि आपल्या गोड आवाजाने रसिकांना एक वेगळीच भक्तिमय अनुभूती देतअसतात..
तीर्थ विठ्ठल, माझे माहेर पंढरी, अभंगवाणी सह राधे तुला, लंगडा ग लंगडा, कानडा राजा, खेळ मांडीयेला, पाऊले चालती, माऊली माऊली, या भक्ती गीतांनी प्रचंड वन्समोअरसह आषाढी महोत्सवाचे वातावरण बदलून जाते.
स्व पिताश्री डॉ आत्माराम सरकटे यांच्या स्मरणार्थ, “जय हरी विठ्ठल ” या प्रमोद सरकटे व डॉ कीर्ती सरकटे यांची संकल्पना असलेल्या आषाढी महोत्सव कार्यक्रमाचे विठ्ठल पूजन आणि दीप प्रज्वलन एमजीएम विद्यापीठाचे कुलपती शिक्षणमहर्षी अंकुशराव कदम , अनुराधा कदम आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
संयोजन समितीचे भाऊसाहेब थोरात, डी एस काटे ,डॉ सतीश गोरे, प्रशांत नरवडे , सतीश ललवाणी, भाऊ सुरडकर, ॲड.रवी शिंदे, प्रा.रवींद्र बनसोड, प्रशांत बनसोड, वैभव थोरात, राजेंद्र शर्मा, विशाल आदमाने आणि व्यवस्थापन ॲड. रवी शिंदे, बंटी तौर, सुधाकर शिंदे, विशाल शिंदे बघत असतात.
दरवर्षी राजकीय सामाजिक अध्यात्मिक शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर यांच्या उपस्थिती सह शहरातील तसेच मराठवाड्यातून रसिक श्रोते रुक्मिणी नाट्यगृहातजय हरी विठ्ठल कार्यक्रमाचा आनंद घेतात.
कार्यक्रमाच्या प्रवेशिका _(मोबाईल नंबर 8799992457 ,9850617777 ) आणि गजानन मंदिर गारखेडा तसेच ‘स्वरराज’ ,1, कासलीवाल सुवर्ण योग गारखेडा येथे उपलब्ध आहेत. सर्वानी लाभ घ्यावा असे “जय हरी विठ्ठल” संयोजन समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.