छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश नोंदणीसाठी ३० जुनपर्यंत संधी

छत्रपती संभाजीनगर,२४ जून / प्रतिनिधी :- छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक येथे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता पॉलिटेक्निक प्रवेशासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर दि. १ जुन २०२३ पासून नावनोंदणी सुरु झाली असून प्रवेश नोंदणीसाठी  शनिवार, ३० जुनपर्यंत शेवटची संधी आहे.

विद्यार्थी व पालकांना प्रवेश प्रक्रियेची सविस्तर  माहिती मिळावी, तसेच ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मदत व्हावी. यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने सुविधा केंद्राची स्थापना केली आहे. या सुविधाकेंद्रावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्र अपलोड करणे, सर्व विद्याशाखांची माहिती, त्यांचे मागील वर्षाचे कट -ऑफ, प्रवेशासाठी लागणारे कागपत्रांची माहिती, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या सर्व शिष्यवृत्यांची माहिती, तसेच पॉलिटेक्निक अभ्यासक्रम पूर्ण केल्यांनतर शाखानिहाय भविष्यातील संधी इत्यादी बाबत सविस्तर समुपदेशन केले जात आहे.        

छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक (एफ. सी. क्रमांक – २१७६) हे पॉलिटेक्निक प्रवेशासाठी शासनाचे मान्यता प्राप्त सुविधा केंद्र आहे. तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाचे सहसंचालक श्री. उमेश नागदेवे यांनी प्रत्यक्ष भेट दिली. त्यांनी भेटीदरम्यान विद्यार्थी, पालक व सुविधा केंद्रातील स्टाफ यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी  विद्यार्थी व पालकांनी  सांगितले की छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकमधील सुविधा केंद्रावर सर्वोतोपरी मोफत मार्गदर्शन व नाव नोंदणीसाठी मदत केली जाते. तसेच या महाविद्यालयामधील उपलब्ध सोयी सुविधाबाबत समाधान व्यक्त केले. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी या सुविधाकेंद्रावर येऊन पॉलिटेक्निक प्रवेशासाठी नाव नोंदणी केली आहे. याबद्ल सहसंचालक उमेश नागदेवे यांनी समाधान व्यक्त केले. 

छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ  पॉलिटेक्निकमधील उत्तीर्ण होणारे विद्यार्थी दरवर्षी विविध नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पदावर रुजू  होतात. येथील वैविध्यपूर्ण  शिकवण्याची पद्धत, अद्यावत लॅबोरेटरीज, विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, भव्य क्रीडांगण, स्वच्छ व नैसर्गिक वातावरण  यामुळे येथील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो व ते खात्रीशीर उच्च शिक्षण किंवा चांगल्या नोकरीवर हजर होतात. येथे उपलब्ध असलेल्या सुविधा केंद्र व मार्गदर्शन केंद्राचा विद्यार्थी तसेच पालकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे यांनी केले.