छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिवस  साजरा

छत्रपती संभाजीनगर,२३ जून / प्रतिनिधी :- येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था येथे नवव्या  आंतरराष्ट्रीय  योग दिनाअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘वसुदेव कुटुंबकम‘ संचलित ‘हर घर आंगण योग’ या अंतर्गत योगदिनाचे औचित्य साधून विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते . तसेच योग शिबिराचे आयोजित करण्यात आले.
         भारतासारख्या अतिशय प्राचीन आणि वैभवशाली परंपरा लाभलेल्या देशात योगशास्त्राचा उगम झाला. या अतिप्राचीन अद्भुत शास्त्राची मुळे खोलवर रुजवण्यासाठी योग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाद्वारे साधकांमध्ये योगाची आवड जन माणसांमध्ये निर्माण व्हावी,  हाच खरा एकमेव उद्देश. 
या कार्यक्रमांतर्गत प्रार्थना, पूरक व्यायाम, आसन -दंड स्थिती ,बैठक स्थिती, विपरीत शयन स्थिति, शयन स्थिती ,प्राणायाम ,एकादश ओंकार, शांतीपाठ, घेण्यात आले. योगसंकल्प’ चे वाचन करण्यात आले.
  संस्थेच्या आयुर्वेद महाविद्यालयात स्वस्थवृत्त व योग विभागांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये 30 days countdown activity for students for 9 th IYD, निबंध स्पर्धा, व्हिडिओ स्पर्धा, चित्र प्रदर्शन, योग ग्राम व्हिजिट, विविध व्याख्याने, पूर्व योगासत्र असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
 या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. या कार्यक्रमासाठी बक्षीस वितरण करून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पदक देऊन गौरविण्यात आले. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती अंतर्गत घेण्यात आलेल्या कॉमन योगा प्रोटोकॉल ऑनलाइन ट्रेनिंग कोर्समध्ये ज्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांमध्ये नियमित योग अभ्यास केला.  त्या इं अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या योगशिबिर करता प्राचार्य डॉ. श्रीकांत देशमुख, उपप्राचार्य डॉ. जयश्री देशमुख, दंत महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. लता काळे, अभियांत्रिकी महाविद्यालय  प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, तंत्रनिकेतन महाविद्यालय  प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे,  कृषी महाविद्यालय प्राचार्य डॉ. प्रवीण बैनाडे उपस्थित होते. या योग दिनास आयुर्वेद महाविद्यालय, दंत महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन महाविद्यालय, कृषी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी वर्ग, कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वस्थवृत्त विभागप्रमुख डॉ. वनिता पुरी यांनी केले तसेच या क्रियांचे प्रात्यक्षिक योग शिक्षिका रुपा क्षीरसागर /जाधव यांनी केले. या कार्यक्रमाकरिता स्वस्थवृत्त विभाग प्रपाठक डॉ. लता राठोड , डॉ. निलेश भोसले व डॉ. प्रतिभा काळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, विद्यापीठ गीत ,योग गीत यांनी झाली.