मतदार संघ कधीच कोणाची जहागीरदारी नसते-विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची कृषिमंत्री सत्तार यांच्यावर टीका

छत्रपती संभाजीनगर,२३ जून / प्रतिनिधी :- मतदार संघ कधीही कोणाची जहागीरदारी नसते,त्यामुळे सिल्लोडचे आपण सुलतान आहोत अशा अहंकारात कोणी कधीही वागू नये अशी अप्रत्यक्ष टिका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सिल्लोड येथे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर केली.तसेच शेतकरी,कष्टकरी,गरीब व सर्वसामान्य जनतेसाठी शिवसेना पक्ष स्थापन झाला असून सुरुवातीच्या काळापासून हिंदुत्वासाठी त्याने नि: स्वार्थ भावनेने कार्य केलेले आहेत. त्यामुळे आगामी काळात निवडणुकीच्या अनुषंगाने समर्पण भावनेने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्य करावे,असाही सल्ला त्यांनी पदाधिकाऱ्यांना यावेळी दिला.

शिवसेना पक्ष व संभाजीनगर शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शिवगर्जना “आता जिंकेपर्यंत लढायचं” या संपर्क मोहिमेदरम्यान त्यांनी आज ता. 23 जून रोजी फुलंब्री,सिल्लोड व सोयगांव तालुक्यातील गावांचा दौरा केला.यावेळी त्यांनी या गावातील शाखेच्या पदाधिकाऱ्यांशी संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने चर्चा केली तसेच ग्रामीण भागातील प्रश्नासंदर्भात स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

यावेळी बोलताना दानवे म्हणाले की, शिंदे – फडणवीस सरकार आल्यापासून शेतकरी व ग्रामीण भागातील समस्या वाढल्या असून सामान्य नागरिक हवालदिल झाला आहे.आपल्याला या लोकांसाठी सकारात्मकपणे कार्य करायचे आहेत.तसेच येणाऱ्या काळात प्रभावीपणे कार्य करून संघटन मजबूत करायचे आहे.त्यामुळे सर्वसामान्यांच्या कामाचा पाठपुरावा करून त्यांचे मूलभूत प्रश्न सोडा असे त्यावेळी म्हणाले. 

तसेच,मुंबईतील बांद्रा येथील शिवसेना शाखा सत्ताधाऱ्यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीमुळे पाडण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी आज सिल्लोड तालुक्यातील वाघेरा येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना दानवे म्हणाले की, शिवसेना पदाधिकारी कोणाच्या हुकूमशाही प्रवृत्ती पुढे समर्पण करणारे नाहीत.एकेकाळी तालुक्यात पक्षाची संघटना चांगल्या प्रकारे मजबूत होती.अजूनही तिची धार अशाच प्रकारे टिकून असुन आगामी काळात सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट आणि दडपशाहीच्या वृत्ती विरोधात लढण्यासाठी आपल्याला सामूहिक पद्धतीने कार्य करावे लागेल.तसेच स्थानिक आमदारांचे मागील काही दिवसांमध्ये जमीन बळकावल्या प्रकरणी विविध घोटाळे बाहेर आले आहेत.मंत्री पदाचा व सत्तेचा ते दुरुपयोग करत असून त्यांच्या या भ्रष्ट  कारभारावर आता लक्ष द्यायचे असल्याचे ते यावेळी म्हणाले. 

याप्रसंगी आमदार उदयसिंह राजपूत, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, उपजिल्हाप्रमुख जगन्नाथ पवार, तालुकाप्रमुख सोमनाथ करपे,रघुनाथ घरमोडे,सुधाकर काळे,शिवसैनिक शामराव लोखंडे,विधानसभा संघटक अक्षय खेडकर,तालुका संघटक अमित वाहुळ,उप तालुका प्रमुख संजय मोटे, राधाकिसन कोलते,शहर प्रमुख संदीप शेरकर,महिला आघाडी युवती  जिल्हाप्रमुख पूजा घुगे,जिल्हा युवा सेना चिटणीस पुरुषोत्तम मोरे, तालुका संघटक अमित वाहुळ, शिवसेना तालुकाप्रमुख राजू तायडे, स्वप्निल पाटील,उप तालुका प्रमुख संजय मोटे,राधाकिसन कोलते,गोविंद लहाने,उमेश दुतोंडे,शहर प्रमुख संदीप शेरकर,महिला आघाडी तालुका प्रमुख मंगलाताई कापरे,उप तालुका प्रमुख रामेश्वर काळे,महेंद्र बावस्कर,दादा काळे,किसान सेना उपतालुका प्रमुख गणेश काळे,विठ्ठल बदर,संजय कळात्रे, रघुनाथ चव्हाण,लखन सिंह ठाकूर, रघुनाथ चव्हाण विभाग प्रमुख कृष्णा पवार,राम सिसोदे, उपविभाग प्रमुख कृष्णा पवार, गोविंद पाडेजी,रा जू चव्हाण,साईनाथ ईधारे,शाखाप्रमुख शायद शेख, पांडुरंग वाघ,भिवसन व्यवहारे व विभाग प्रमुख प्रदीप गाडेकर उपस्थित होते.