तिफण-२०२३ राष्ट्रीय स्पर्धेत छत्रपती शाहु अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्वयंचलित ‘रोप लागवडी यंत्र’भारतात द्वितीय

छत्रपती संभाजीनगर:- येथील कांचनवाडी स्थित छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्था संचलित छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एस. ए. ई. तिफण-२०२३ म्हणजेच टेक्नोलॉजी इनोवेशन फोरम फॉर एग्रीकल्चर नर्चरिंग या राष्ट्रीय स्पर्धेत भारतातुन व्दितीय क्रमांक पटकावला.

विद्यार्थ्यांच्या नवनवीन कल्पनेला विविध स्पर्धेच्या माध्यमातून वाव मिळावा. यासाठी सोसायटी फॉर ऑटोमोटीव्ह इंजिनिअर्स इंडिया (एस.ए.ई.) दरवर्षी नवनवीन कल्पना घेऊन स्पर्धा आयोजित करत असते. यावर्षी म्हणजे २०२३ मध्ये  सोसायटी फॉर ऑटोमोटीव्ह इंजिनिअर्स इंडिया (एस.ए.ई.) यांच्याव्दारे जॉन डीअर इंडिया प्रा. लि. व महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे दि. ०३ जून २०२३ ते ०४ जून २०२३ या दरम्यान दोन दिवसीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सोसायटी फॉर ऑटोमोटीव्ह इंजिनियर्स इंडिया (एस. ए. ई.) यांच्याव्दारे ‘स्वयंचलित पालेभाजी रोपण यंत्र’ हा प्रकल्प विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. 

आयोजकांचा मुख्य उद्देश हा होता की प्रकल्प विद्यार्थ्यांनी स्वतः अभ्यास करून प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली देशी बनावटीचे साहित्य वापरून महाविद्यालयाच्या कार्यशाळेत बनवावा. ज्यामध्ये शेतीची कामे कमीत कमी वेळेत जास्त क्षेत्रात शास्त्रशुद्ध पद्धतीने, वेळेची बचत करता येईल. या यंत्राचा वापर शेतकरी स्वतः किंवा मजुराच्या माध्यमातुन देखील करून घेऊ शकतो. असा विषय समोर ठेऊन विद्यार्थ्यांनी स्वयंचलित पालेभाजी रोपण यंत्र विकसित करण्याचा मानस ठेवला. यात टोमॅटो, मिरची आणि वांगी यांसारख्या वनस्पतींची लागवड स्वयंचलित पालेभाजी रोपण यंत्राद्वारे करता येते. यंत्राव्दारे ट्रे मधून रोप उचलून हे आपोआप जमिनीत लावले जाते. ही यंत्रणा कमीत कमी मनुष्यबळ आणि कमीत कमी वेळेत अधिक पालेभाजी रोपे लावू शकते. यंत्रामुळे दोन रोपांमधील अंतर ही कमी होते. त्यामुळे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन मिळते.  

या स्पर्धेत भारतातुन ५४ अभियांत्रिकी व कृषी महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा दोन टप्यात घेण्यात आली. यामध्ये पहिली फेरी ही आभासी पद्धतीने (प्रकल्प सादरीकरण) आणि दुसरी फेरी प्रात्यक्षिक पद्धतीने होती. या दोन्ही फेरीत छत्रपती शाहु अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत संघाने भारतातुन व्दितीय क्रमांक पटकावत रोख रक्कम रु. १,००,०००/- (रु. एक लाख) बक्षीस मिळविले.

स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा दि. ०४ जुन २०२३ रोजी घेण्यात आला. यावेळी श्री. संजय देसाई (उत्पादन व्यवस्थापन, महिंद्रा आणि महिंद्रा), श्री. गणपती पुनगुन्द्रन (सहाय्यक संयोजक, तिफण २०२३ – जॉन डीअर इंडिया प्रा.लि.) श्री. के. सी. बोरा (एस. ए. ई. इंडिया), डॉ. डी. डी. पवार (अधिष्ठाता, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी), श्री. आनंद राज (जॉन डीअर इंडिया प्रा. लि.), श्री. अमित बोरा (जॉन डीअर इंडिया प्रा. लि.), श्री. महेश मासुळकर (जॉन डीअर इंडिया प्रा. लि.) यांची प्रमुख उपस्थिती होती.   

यंत्र विकसित करण्यासाठी महाविद्यालयाच्या संघामध्ये वैभव जाधव (कर्णधार), सोपान भोपळे (व्यवस्थापन प्रणाली), अभिषेक अधाने (प्रयोगशाळा व्यवस्थापक), रवींद्र घाटे व महेश हेंद्रे (बीजारोपण प्रणाली), शेख दानियाल व गुफरान अन्सारी (स्वयंचलित यंत्रणा), गणेश जन्ढे व राणी राठोड  (विद्युत पारेषण), रोहन मुरदारे, ओम घाडगे, अनिकेत गाडे, पवन कर्पे, श्रीनाथ पाटील, नितीन ताठे, अनिकेत साळुंके, अर्जुन मतने, ओंकार हुगेवार (उत्पादन), जान्हवी पाटील, मयुरी जामधर, रिया धूत, जान्हवी बैरागी, आरती मोहन (विपणन), निकिता राठोड व अल्ताफ शेख (प्रोग्रामिंग प्रणाली), प्रमोद भंडारे, स्नेहा शिंदे, कुणाल निकम, अभिषेक शिंदे, केतन अरसुले आणि विद्याशाखा सल्लागार प्रा. सचिन लहाने, प्रा. युवराज नरवडे, सहाय्यक मार्गदर्शक श्री शुभम गुप्ता (जॉन डीअर इंडिया प्रा. लि.), यांत्रिकी अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. आर. पी. चोपडे, प्रा. संजय कुलकर्णी (प्रशिक्षण विभाग), डॉ. मनोज मते, अंकिता एग्रो इंजिनीअरिंग संचालक श्री. एस. एन. पाटील, श्री. विष्णू खडप, श्री. सुनील जाधव, श्री. दिपक पवार, श्री. अनिल मालकर, व शेती अभ्यासक श्री. जनार्धन कांबळे यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. रणजित मुळे, संस्थेचे सचिव श्री. पद्माकरराव मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, उपप्राचार्य डॉ. देवेंद्र भुयार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.