वैजापूर तालुक्यात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

आ.रमेश बोरणारे यांच्याहस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप 

वैजापूर ,११ जून/ प्रतिनिधी :- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसेच पक्ष संघटना बळकट करण्यासाठी शिवसेना शिंदे गटातर्फे वैजापूर विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून नवनियुक्त शिवसेना – युवासेना पदाधिकाऱ्यांना आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या हस्ते रविवारी नियुक्तीचे पत्र वाटप करण्यात आले.

आ.बोरणारे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वैजापूर – गंगापूर तालुक्यातील शिवसेना – युवासेना पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. याप्रसंगी आ. रमेश बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, वैजापूर बाजार समितीचे सभापती रामहरीबापू जाधव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, माजी तालुकाप्रमुख खुशालसिंग राजपूत आदींची मार्गदर्शनपर भाषणे झाली. आ.रमेश पाटील बोरणारे यांनी वैजापूर मतदारसंघात मोठ्याप्रमाणात विकास कामे केली असून या विकास कामांच्या जोरावर आ. बोरणारे हे पुन्हा निवडून येतील असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष साबेर यांनी यावेळी बोलतांना केले. 

आवेज खान अझहर खान

या पदाधिकारी नियुक्ती मेळाव्यात आवेज खान अझहर खान, ललित बाबासाहेब गावडे, किशोरसिंग राजपूत (गोटूभाऊ), रियाज कुरेशी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र आ. रमेश बोरणारे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले. या मेळाव्यास शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष काळवणे, युवासेनेचे जिल्हा समन्वयक भरत कदम, आमिर अली, बाळासाहेब चव्हाण, बाजार समितीचे माजी सभापती भागीनाथ मगर, पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश पाटील हिंगे, रहीम खान, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, शहरप्रमुख पारस घाटे, युवासेनेचे तालुकाप्रमुख श्रीराम गायकवाड, महिला आघाडीच्या सुलभाताई भोपळे, करुणाताई पोळ, वर्षाताई गंडे, सुप्रिया व्यवहारे, महेश बुणगे, अमोल बोरणारे, वसंत त्रिभुवन, खलील मिस्तरी, मधुकर त्रिभुवन, बबन त्रिभुवन, कमलेश आंबेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.