वैजापूर येथे डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी

वैजापूर ,​३०​ एप्रिल  / प्रतिनिधी :- सामाजिक बांधिलकी जपत डॉक्टर्स असोसिएशन वैजापूरच्या वतीने रविवारी (ता.30) येथील मौलना आझाद विद्यालयात आयोजित मोफत सर्व रोग निदान व आरोग्य  तपासणी  शिबिरात विविध प्रकारच्या व्याधीनी त्रस्त अशा साडे तीनशेच्या वर रूग्णांची मोफत आरोग्य तपासणी करुन औषध व विविध तपासण्यात सवलत देण्यात आली. 

या शिबिराचे उदघाटन आनंद हॉस्पिटलचे डॉ. अरविंद अन्नदाते यांनी केले. अध्यक्षस्थानी आ.रमेश पाटील बोरणारे होते. थुंकी, रक्त व लघवी तपासणीला अकरा  हजार रुपयांचे अर्थसहाय्य आ.बोरणारे यांनी दिल्याने ही तपासणी मोफत  करण्यात आली. इतर गोळ्या, औषधीवर दहा टक्के सुट देण्यात आली.

 

याप्रसंगी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरखान, पालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत, नगरसेविका सुप्रिया व्यवहारे, डॉ. प्रीती भोपळे,स्वप्निल जेजुरकर, बिलाल सौदागर, मर्चंट बँकेचे चेअरमन विशाल संचेती, माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यांनी भेटी दिल्या. डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सुभाष भोपळे, डॉ.योगेश राजपूत, डॉ.दिनेश राजपूत, डॉ.महाडिक, डॉ.शर्मा, डॉ.अग्रवाल यानी मान्यवरांचे स्वागत केले. 

या शिबिरात येवला येथील डॉ.शरद गायकवाड, डॉ.डी.ए.कुलकर्णी, छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. आकाक्षा महाजन, डॉ.चैतन्य तांबे, नेत्रतज्ञ डॉ.संतोष संघवी, डॉ. फहिमा शेख, डॉ. प्रतिमा सोनवणे, डॉ.बी. बी. शिंदे यांच्यासह असोसिएशनचे सर्व डॉक्टर्स यांनी रुग्ण तपासणी केली. असोसिएशनच्यावतीने यापुढेही असे शिबिर व विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील असे असोसिएशनचे डॉ. सुभाष भोपळे व डॉ. योगेश राजपूत यांनी सांगितले. आनंद हॉस्पिटलच्या आरोग्य सेवकांनी सहभाग नोंदविला.