अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाश्याचा हल्ला

सोयगाव,२६  एप्रिल / प्रतिनिधी :-अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मंगळवारी दुपारी  मधमाशांनी हल्ला केल्याने ​१५​ पर्यटक जखमी झाले.

लेणी क्रमांक ​१०​ जवळ दुपारी  अचानक मोठ्या प्रमाणावर मधमाशांनी दिसेल त्या  पर्यटकांवर हल्ला करून दंश केला अचानक  आलेल्या संकटामुळे जीव वाचवण्यासाठी पर्यटक पळू लागले  सुदैवाने या मधमाशांच्या हल्यात  किरकोळ जखमी झालेले पर्यटक  नंतर रवाना झाले उन्हाळा सुरू झाला म्हणजे मोठ्या प्रमाणावर   आग्या मोहोळ लेणी परिसरात असतात  जोरदार  हवा सुरू झाले की यातील मधमाशा पोळे सोडून दिसेल  त्यावर हल्ला करतात काही दिवसापूर्वी वेताळ वाडी किल्ला पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाश्या नी हल्ला करून ​१५​ पर्यटक जखमी केले होते,भारतीय पुरातत्त्व विभागाचे‎ कर्मचारी भारत काकडे, रामधन‎ सोन्ने, गणेश मोहिते, रमेश फुकटे,‎ फकिरा तडवी, उखर्डू रावलकर हे‎ मधमाशांच्या हल्ल्यात जखमी‎ झाले. स्थानिकांनी जखमी‎ पर्यटकांच्या अंगात मधमाशांचे‎ रुतलेले काटे काढले.‎