बीआरएसच्या सभेसाठी वैजापूर तालुक्यातून दहा हजार कार्यकर्ते जाणार – अभय पाटील चिकटगावकर

वैजापूर ,२३ एप्रिल  / प्रतिनिधी :- छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी (ता.24) होणाऱ्या भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस पक्षाच्या सभेसाठी वैजापूर तालुक्यातून नेतृत्वात दहा हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.अशी माहिती अभय पाटील चिकटगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तेलंगणा राज्यात भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) विविध योजना राबवत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. आगामी काळात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्यात सत्ता परिवर्तन होणार आहे. वैजापूर तालुक्यासह विधानसभा मतदार संघात असलेल्या गंगापूर तालुक्यातील53 गांवांचा विकास करण्यासाठी आपण बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे, अशी माहिती युवा नेते अभय पाटील चिकटगांवकर यांनी दिली.

लोकनेते दिवंगत कैलास पाटील चिकटगांवकर यांनी केलेली विकासकामे समाजाच्या हितासाठीची मार्गदर्शक तात्विक विचारांची ज्योत तालुक्यातील जनतेसाठी सतत तेवत ठेवण्यासाठी बीआरएस हा पक्ष निवडल्याचे त्यांनी सांगितले. याबरोबरच  के. चंद्रशेखर राव यांच्या छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी (ता. 24) होणाऱ्या सभेसाठी वैजापूर तालुक्यातून दहा हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.तेलंगणामध्ये बीआरएस सरकारने शेतकरी व उद्योगांना 24 तास पाणी व वीज मोफत बियाण्यांसाठी दहा हजारांचे अनुदान, पांच लाख रुपयांचा वीमा यांसह विविध जनकल्याणकारी योजना राबविल्या असल्याचेही अभय पाटील यांनी सांगितले.

 पुढील काळात देशभरात पक्षाचा विस्तार करण्यात येणार आहे, त्याची सुरुवात महाराष्ट्रापासून होत असल्याचेही त्यांनी सांगितले.तालुक्यातील प्रत्येक गावांत बीआरएस या  पक्षाची स्थापना करून ,युवकांसह प्रस्थिपीत पक्षांनी वाऱ्यावर सोडलेल्या नेतृत्वांना बीआरएस पक्ष हा एक मोठा पर्याय होतोय.राज्यभरात बीआरएसची गाव तिथे शाखा आगामी काळात होईल याची सुरूवात वैजापूर तालुक्यापासून करणार असल्याचेही अभय पाटील यांनी सांगितले.या सभेत तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचेही अभय पाटील यांनी सांगितले.