प्रकाश आंबेडकरांनी केली शरद पवारांवर टीका; संजय राऊत म्हणाले, आंबेडकरांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही

प्रकाश आंबेडकरांच्या खिजगणतीत संजय राऊत नाहीत

सल्ला ठाकरेंनी दिला असता तर मानला असता; आंबेडकरांचे राऊतांना प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जरा जपून शब्द वापरावे, अशा प्रकाश आंबेडकरांना सल्ला दिला आहे. मात्र हाच सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला असता तर मानला असता, असे प्रत्युत्तर देत संजय राऊत हे आपल्या खिजगणतीतही नाहीत हे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दाखवले आहे.

शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत, या प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीत ठिणगी पडली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून या वक्तव्याला विरोध केला जात आहेत.

शुक्रवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘आमची युती ही शिवसेनेसोबत आहे. उद्धव ठाकरे आम्हाला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडी एमआयएमसोबत युती करणार नाही.’ पुढे राऊतांनी दिलेल्या सल्ल्याबाबत आंबेडकर म्हणाले की, ‘जपून बोलण्याचा सल्ला जर उद्धव ठाकरेंनी दिला असता तर मानला असता.’

शरद पवारांसंबंधित केलेल्या विधानाबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘मी ते विधान इतिहासामधील काही घटनांवरून केले होते. सद्यपरिस्थितीशी त्याचा काहीही संबंध नाही. जर कोणी त्या विधानाला चुकीच्या पद्धतीने घेत असेल तर मी त्याला काही करू शकत नाही.’