हिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 48 रुग्ण,दोघांचा मृत्यू

हिंगोली,दि.13.: जिल्ह्यात 48 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी आज दिली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 4 व्यक्ती आणि सेनगाव परिसर एक व्यक्ती तर आरटीपीसीआर टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 26 व्यक्ती, वसमत परिसरात 12, औंढा परिसर एक व्यक्ती तर सेनगाव परिसर 4 व्यक्ती असे एकूण 48 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर 44 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आज दोन कोव्हिड -19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 23 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 7 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 30 रुग्णांची सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 2 हजार 118 रुग्ण झाले असून, त्यापैकी 1 हजार 619 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 473 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोवीड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 26 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक किशोरप्रसाद श्रीवास यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *