नांदेड जिल्ह्यात 147 कोरोनाबाधितांची भर तर दोघांचा मृत्यू

नांदेड दि. 1 :- जिल्ह्यात आज 1 ऑगस्ट 2020 रोजी सायं. 6 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 48 व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 147 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकूण 1 हजार 281 अहवालापैकी 1 हजार 88 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 1 हजार 986 एवढी झाली असून यातील 935 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण 957 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 15 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 7 महिला व 8 पुरुषांचा समावेश आहे.

शुक्रवार 31 जुलै रोजी दत्तनगर नांदेड येथील 48 वर्षाचा एक पुरुष जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर शनिवार 1 ऑगस्ट रोजी चिरागगल्ली नांदेड येथील 75 वर्षाचा एक पुरुष डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत पावले. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 83 एवढी झाली आहे. आज बरे झालेल्या 48 कोरोना बाधितांमध्ये मुखेड कोविड केअर सेंटर येथील 22, कंधार कोविड केअर सेंटर येथील 4, बिलोली कोविड केअर सेंटर येथील 1,पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथील 1 अशा 48 कोरोना बाधित व्यक्तींना औषोधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीसर्वेक्षण- 1 लाख 49 हजार 367,घेतलेले स्वॅब- 15 हजार 75,निगेटिव्ह स्वॅब- 11 हजार 764,आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 147,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 हजार 986,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 21,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 13,मृत्यू संख्या- 83,रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 935,रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 957,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 252.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *