जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली बिल्डा येथील ई-पीक प्रकल्प पाहणी

औरंगाबाद दि 13

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बिल्डा येथील रामदास मूळे यांच्या शेतात जाऊन ई – पीक प्रकल्प पाहणी केली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप जाधवर, उपविभागीय अधीकारी स्वप्नील मोरे, उपविभागीय कृषी अधीकारी पी. आर . जाधव , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे,जिल्हा तालुका कृषी अधिकारी सुभाष आघाव , आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ई- पीक पाहणी या पथदर्शी प्रकल्प अंतर्गत महाराष्ट्र शासनाने विकसित केलेल्या मोबाईल अप्लिकेशन द्वारे पिकांची नोंदी घेण्याचे शेती बांधावर प्रात्यक्षिक करून कामकाजाची पाहणी केली.

यावेळी उपस्थित सरपंच व शेतकरी बांधवाना संपूर्ण गावातील ई- पिक पाहणीचे काम पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शन केले,तसेच बिल्डा गावचे तलाठी यांनी संबंधित शेतकरी यांच्या उपस्थितीत ई- पीक पाहणी मोबाईल अप्लिकेश मध्ये उभ्या पिकांची माहीत भरून Geotagged फ़ोटो अपलोड केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *