जागतिक आरोग्य दिनानिमित्त भव्य रॅली

छत्रपती संभाजीनगर,८  एप्रिल / प्रतिनिधी :-  वैद्यकीय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशांन्वये तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक, श्री. गिरीश महाजन (वैद्यकीय शिक्षण मंत्री) यांच्या निर्देशानुसार आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त जागतिक आरोग्य दिनानिमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.       

छत्रपती संभाजीनगर समर्थनगर येथील सिद्धार्थ गार्डन येथे रॅलीचे उद्घाटन डॉ. संजय राठोड (अधिष्ठाता, शासकीय वैदयकीय महाविद्यालय), डॉ. हेमंत फटाले, डॉ. अर्चना वरे, डॉ. अरुण अडचित्रे, डॉ. निलेश लोमटे, डॉ. अमोल बुकन, डॉ. अजय लोहिया, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. अमित वांगीकर, डॉ. राजन महिंद्रा, डॉ. संदीप कांबळे, डॉ. शीतल अंतापुरकर, डॉ. वैजनाथ यादव या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सकाळी 06.30 वाजता रॅलीची सुरुवात समर्थनगर येथील सिद्धार्थ गार्डनजवळ निघून मुख्य बसस्टँड, पोलीस आयुक्तालयमार्गे घाटी रुग्णालयाच्या प्रांगणात या रॅलीचा समारोप करण्यात आला.     

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ २५ वा रौप्य महोत्सव साजरा करत आहे. दि. १ जानेवारी २०२३ ते दि. १० जुन २०२३ या कालावधीत विद्यापीठाद्वारे विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये जागतिक महीला दिनानिमित्त ‘ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस अँड ट्रीटमेंट’ त्यानंतर दि. २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन (ओरल हेल्थ मिशन अवेअरनेस) आणि दि. ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य  दिनानिमित्त  (कॅटरॅक्ट /थायरॉईड अवेअरनेस) या आजाराबाबत जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन विद्यापीठ संलग्नित सर्व महाविद्यालयाद्वारे करण्यात आले होते.          

तसेच म. आ. वि. वि. सलग्नित CSMSS आयुर्वेद महाविद्यालय, CSMSS दंत  महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण आयुर्वेद महाविद्यालय, धनेश्वरी आयुर्वेद महाविद्यालय आणि संशोधन केंद्र, साई आयुर्वेद मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटर, डी. के. एम. एम. होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय, फोस्टर डेव्हलपमेंट होमियोपॅथी महाविद्यालय, कमलनयन बजाज परिचर्या महाविद्यालय, शासकिय दंत महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, डॉक्टर, विद्यार्थी मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाले होते.         

यावेळी उपस्थितांना शासकीय वैदयकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. संजय राठोड आणि डॉ. हेमंत फटाले, CSMSS आयुर्वेद महाविद्यालय प्राचार्य तथा विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. श्रीकांत देशमुख आणि डॉ. अमित वांगीकर यांनी मार्गदर्शन केले तर  सूत्रसंचालन डॉ. संजय सरोदे यांनी केले.