छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे जनसंपर्क अधिकारी संजय अंबादास पाटील यांना ‘स्व. मोहनलालजी बियाणी कार्यगौरव’ पुरस्कार प्रदान   

छत्रपती संभाजीनगर,८  एप्रिल / प्रतिनिधी :-  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई आणि दैनिक ‘मराठवाडासाथी’ च्या संयुक्त विद्यमाने मागील तीन वर्षापासून देण्यात येणाऱ्या पत्रमहर्षी स्वर्गीय मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार- २०२३ दिनांक ७ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री श्री. अतुल सावे यांच्या शुभ हस्ते हॉटेल वर्षा इन येथे एका भव्य-दिव्य कार्यक्रमात पत्रमहर्षी  स्व.मोहनलाल बियाणी  ‘कार्यगौरव’ पुरस्कार कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्री. संजय अंबादास पाटील यांना पत्नी ज्योती आणि आई रुक्मिणी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे,  महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे, दैनिक मराठवाडा साथीचे संपादक चंदूलाल बियाणी, जगदीश बियाणी, महाराष्ट्र पत्रकार संघ छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष डॉ. प्रभू गोरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य-दिव्य कार्यक्रम झाला  

          यंदा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारासोबतच ‘पत्रकारिता जीवनगौरव’ पुरस्कार व जनसंपर्कात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘कार्यगौरव’ पुरस्कार देण्यात आला.या सन्मानाबद्दल  छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था अध्यक्ष रणजित मुळे, सचिव पद्माकर मुळे, विश्वस्त समीर मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख,अंबादास वाळूंज पाटील, संजय घुले पाटील, पांडुरंग बडग,  संजय नाना जाधव, संदीप वाळुंज पाटील, प्रणव पाटील यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.