परभणी जिल्ह्यात 780 रुग्णांवर उपचार सुरू, 113 रुग्णांची वाढ

परभणी, दि. 10 :- जिल्ह्यातील 113 रुग्णांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3625 एवढी झाली आहे. त्यापैकी 2705 बरे झाले तर 140 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 780 जणांवर उपचार सुरु आहेत. बुधवार दि.9 सप्टेंबर 2020 रोजी एकुण 116 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली तर एका रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *