नांदेड जिल्ह्यात 327 बाधितांची भर तर तीन जणांचा मृत्यू

नांदेड दि. 10 :- गुरुवार 10 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 121 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 327 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 88 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 239 बाधित आले.

आजच्या एकुण 1 हजार 334 अहवालापैकी 949 अहवाल निगेटिव्ह आले.जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 10 हजार 313 एवढी झाली असून यातील 6 हजार 484 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 485 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 53 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

या अहवालात बुधवार 9 सप्टेंबर रोजी दत्तनगर नांदेड येथील 64 वर्षाचा एक पुरुष नगीना घाट नांदेड येथील 60 वर्षाची महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर कंधार तालुक्यातील शेकापुर येथील 65 वर्षाचा एक पुरुषाचा मुखेड कोविड रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 283 झाली आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 62 हजार 749,निगेटिव्ह स्वॅब- 50 हजार 208,आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 327,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 10 हजार 313,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-16,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 20,एकूण मृत्यू संख्या- 283,एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 6 हजार 484,रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 485,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 412, आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 53.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *