निलंगा येथे महाराष्ट्र दिनी 147 रक्तदात्यांनी केले रक्तदान

स्वराज्य सेवाभावी संस्था व देशमुख हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम

निलंगा,२ मे /प्रतिनिधी: 
स्वराज्य सेवाभावी संस्था व देशमुख हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज निलंगा शहरात 21 वर्षाची परंपरा जोपासत रक्तदान शिबिर झाले.यावेळी 147 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला.

नक्षत्र मंगल कार्यालय येथे व ग्रामपंचायत कार्यालय झरी येथे आयोजित शिबिराचे  सतीश पाखरसांगवे, विशाल चव्हाण, अमोल बाहेती, सुशील वजीर, कुलदीप पवार, श्रीमती सरस्वती शाहीर, श्रीमती अश्विनी जाधव, श्रद्धा शाहीर, वैष्णवी शाहीर या रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले तर यावेळी 147 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला.

यावेळी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे, काँग्रेस नेते अभय सोळुंके, डॉ. लालासाहेब देशमुख, ओ.बी.सी.नेते प्रा. दयानंद चोपणे, प्रा.गजेंद्र तरंगे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रा.डॉ. हंसराज भोसले, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद बाहेती, निलंगा ता. जि. प. शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन अरुण सोळुंके, विशाल जोळदापके, कृष्णा नाईक , शुभम पाटील झरीकर, गजानन पाटील, किशोर बिराजदार ,पवन शिंदे, परमानंद जाधव , सुखानंद बिरादार यांनी शिबिरास भेट दिली. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी स्वराज्य सेवाभावी संस्थेचे दत्ता शाहीर , देशमुख हॉस्पिटलचे डॉ.लालासाहेब देशमुख,आनंद जाधव, किशोर दुधनकर, स्वराज शाहीर, साई कांबळे, सचिन निटूरे, स्वरूप शाहीर, विरेंद्र शाहीर,संजय खोत,किरण माने,ईश्वर पाटील,जनार्धन बिरादार,आकाश रासुरे,बब्रुवान जाधव,नामदेव खोत,अरुण जाधव,अविनाश नाईक,संदीप नाईक,अर्जुन नाईक,दुर्गा माकणे यांनी परिश्रम घेतले. तर भालचंद्र ब्लड बँक लातूर चे कर्मचारी डॉ. योगेश गवसाने,जनसंपर्क अधिकारी दिगंबर पवार, किशोर पवार, महेंद्र गांधले,संतोष पाटील, सुनील जहागीरदार, मुजीब सौदागर, श्रीमती पूजा शिंदे,सौ.सुरेखा हजारे,जयप्रकाश सुर्यवंशी, परहान शेख,अरूण कासले,बालाजी वेदपाठक,संजय ठाकूर, महेबूब मुल्ला,नितीन क्षीरसागर, अन्सार शेख यांनी रक्त संकलनाचे काम पाहिले.