केंद्रीय मंत्री नारायण राणे दोषमुक्त

अलिबाग ,१  एप्रिल / प्रतिनिधी :- उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण केल्याच्या गुन्ह्यातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची शनिवारी अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी दोषमुक्त केले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात अलिबागचे मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात भारतीय दंड विधान कलम १५३ (अ), १८९, ५०४ आणि ५०६ कलमानुसार दोषारोप दाखल झाले होते. सदर खटल्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वतीने सुप्रसिद्ध वकील सतीश माने – शिंदे यांनी दोषमुक्तीसाठी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २३९ प्रमाणे या न्यायालयात अर्ज केला होता. यावर न्यायालयाने दोन्हीकडील युक्तिवाद ऐकून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शनिवारी दोषमुक्त केले.