रिक्षा चालकाला बेदम मारहाण ,दोन तासांत पोलिसांनी आरोपींना केले गजाआड

औरंगाबाद:
रिक्षात प्रवासी का घेतले म्हणत एका दुचाकीवर आलेल्या तिघांनी रिक्षा चालकाला अडवुन बेदम मारहाण करित त्याच्याकडील मोबाइल व दीड हजार रुपये असा सुमारे 11 हजार 500 रुपयांचा ऐवज बळजबरी हिसकावुन घेत धूम ठोकली. ही घटना सोमवारी (दि. ८) सायंकाळी मुकुंदवाडी रेल्वेगेट पुलाजवळ घडली.
विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर अवघ्या दोन तासांत  पोलिसांनी तिन पैकी दोन आरोपींना गजाआड केले. कृष्णा भास्कर जाधव (25, विश्रांती नगर, मुकुंदवाडी) व अमोल भाउसाहेब गायकवाड (20, रा. फथरवाडी, पिसादेवी रोड) अशी आरोपींची नावे असुन त्यांना गुरुवारपर्यंत (दि. 11) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. मांजरेकर यांनी मंगळवारी (दि. 9) दिले.
प्रकरणात रिक्षा चालक गोपाल आसाराम पवार (36, रा. संघर्षनगर, मुकुंदवाडी) यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार, सोमवारी दुपारी पवार हे रिक्षातील प्रवाशांना मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन गेट नं. 56 येथे सोडुन परतत असतांना रेल्वेगेट पुलाजवळ एका दुचाकीवर तिन व्यक्ती आल्या. त्यांनी रिक्षा थांबवुन तु गाडीत प्रवासी का घेतले असे म्हणत पवार यांना शिवीगाळ करुन मारहाण करुन लागले. मारहाणीत पवार जमीनीवर कोसळल्यानंतर तिघा आरोपींनी त्यांच्या खिशातील दहा हजार रुपये किंमतीचा मोबाइल व रोख दीड हजार रुपये बळजबरी हिसकावुन घेत धुम ठोकली. प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मुकुंदवाडी पोलिसांनी प्रकरणाचा तपास करुन अवघ्या दोन दासात लुटमार करणार्या तिघांपैकी दोघांना गजाआड केले. दोघा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपीच्या साथीदाराचा शोध घेवुन त्याला अटक करणे आहे. गुन्ह्यातील चोरलेला ऐवज आरोंपीकडून जप्त करणे असुन गुन्ह्यात वापरलेले वाहन देखील जप्त करावयाचे असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करुन न्यायालयाने वरील प्रमाणे आदेश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *