ऑक्टोबर 2024 पर्यंत 1000 शहरे 3-तारांकित कचरामुक्त करण्याचे उद्दिष्ट: हरदीप एस. पुरी

स्वच्छतोत्सव: शहरातील स्वच्छतेसाठी 400,000 हून अधिक महिला उद्योजिकांच्या नेतृत्वाखालील मोहीम

नवी दिल्ली,​३०​ मार्च / प्रतिनिधी:- देशातील 1000 शहरे ऑक्टोबर 2024 पर्यंत 3-तारांकीत कचरामुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे असे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप एस. पुरी यांनी म्हटले आहे. ते आज नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस 2023 निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कचरामुक्त शहरांसाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधे (युएलबी) स्पर्धेच्या भावनेला प्रोत्साहन देण्याकरता  जानेवारी 2018 कचरामुक्त शहर मानांकनाची  (GFC-स्टार रेटिंग) सुरुवात करण्यात आली. सुरुवातीपासूनच नोंदणीत झपाट्याने वाढ झाल्याचं सांगत त्यांनी याच्या प्रगतीवर प्रकाश टाकला. त्यांनी देशभरातील स्वच्छता दूतांशीही संवाद साधला. समाजात बदल घडवून आणत, नेतृत्व दिल्याबद्दल आणि आव्हानांचं रुपांतर उपजिविकेच्या संधीत केल्याबद्दल त्यांनी ‘स्वच्छता दूतांचे अभिनंदन केले.

अभियानाच्या यशाबद्दल त्यांनी यावेळी माहिती दिली. शहरी भारत हगणदारीमुक्त (ODF) झाला आहे. सर्व 4,715 शहरी स्थानिक संस्था (ULB) पूर्णपणे हगणदारीमुक्त झाल्या आहेत.  भारतातील कचऱ्यावर प्रक्रिया होण्याचे प्रमाण 2014 मधील 17% वरून आज 75% वर गेले असून यात  चार पटीने वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.

भारताला कचरामुक्त राष्ट्र बनण्याचे उद्दिष्ट असलेले स्वच्छ भारत अभियान-शहरी अर्थात SBM-U ची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी केलेला संकल्प आणि दृढनिश्चय अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात (SBM-U 2.0) अनेक पटींनी वाढेल असा विश्वास पुरी यांनी व्यक्त केला. वस्तू वापराच्या पद्धतीत झालेला बदल आणि जलद शहरीकरणामुळे कचरा वाढतो आहे, त्या पार्श्वभूमीवर कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी, ‘कचरामुक्त शहरे’ रॅलीचे महत्व त्यांनी अधोरेखित केले.  

शहरे कचरामुक्त होण्यासाठी संबंधित प्रयत्नांना चालना देण्याकरता स्वच्छोत्सव 2023 ची सुरुवात हरदीप सिंग पुरी यांनी 7 मार्च, 2023 रोजी केली. ‘कचरामुक्त शहरे’ करण्यासाठी विविध क्षेत्रातील महिलांना एकत्र आणत सर्व शहरांमध्ये 8 मार्च 2023 पासून विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आहे.  स्वच्छतोत्सव ही शहरातील स्वच्छतेसाठी 400,000 हून अधिक महिला उद्योजिकांच्या नेतृत्वाखालील मोहीम आहे.

घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, वर्गीकरण करणे, कचरा प्रक्रिया आणि तो जमा करण्याचे उपाय, आयईसी, क्षमता वाढवणे, डिजिटल ट्रॅकिंग इत्यादी हे कचरामुक्त शहरांसाठीचे घटक आहेत.

चक्राकार कचरा व्यवस्थापन सुनिश्चित करणे आणि कचऱ्याचे मौल्यवान संसाधनांमध्ये रूपांतर करण्याचा शून्य-कचरा दृष्टीकोन अंमलात आणण्यासाठी, महिला नेतृत्वाच्या भूमिकेचे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार सचिव मनोज जोशी यांनी कौतुक केले.