राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना विमान इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे आवाहन

नवी दिल्ली ,१९ नोव्हेंबर/प्रतिनिधी:- केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री श्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी नागरी हवाई वाहतूक क्षेत्राला बळकट करण्यासाठी सर्व हितधारकांना, विशेषत: राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सहकार्य आणि समर्थन करण्याचे आवाहन केले आहे. आज नवी दिल्ली येथे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांच्या परिषदेला संबोधित करताना श्री सिंधिया म्हणाले की, देशाच्या आर्थिक विकासात या क्षेत्राचे मोठे योगदान आहे परंतु महामारीमुळे कदाचित या क्षेत्राचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. ते म्हणाले की, सामूहिक प्रयत्नांमुळे आम्ही प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी काम करू शकतो आणि या क्षेत्राच्या विस्तारासाठी आणि विकेंद्रीकरणासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू शकतो. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्राकडून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देत मंत्री म्हणाले की, तुमच्या यशातच आमचे यश आहे.

मंत्र्यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना विमान इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केले कारण त्याचा विमानांच्या परिचालन खर्चात मोठा वाटा असतो.  ज्यांनी दरांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आहे अशा अनेकांचे आभार मानताना ते म्हणाले की दर कपाती नंतर अल्पावधीतच  हवाई वाहतूकीचे प्रमाण वाढले आहे. केली आहे. ते म्हणाले की या क्षेत्रामध्ये  खर्च-लाभ गुणोत्तर अधिक लाभदायक आहे  आणि मोठ्या प्रमाणात रोजगार क्षमता देखील आहे.