अंबाजोगाई शहरात होणारे मराठी विद्यापीठ विदर्भात पळवले – राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

अंबाजोगाई ,१३ मार्च /प्रतिनिधी :-अंबाजोगाई शहरात होणारे मराठी विद्यापीठ विदर्भात पळवले आहे. हे नियोजित मराठीचे विद्यापीठ पुन्हा अंबाजोगाई शहरात स्थापित करावे अशी मागणी संपूर्ण मराठवाडा वासियांकडून विशेषतः अंबाजोगाईकरांच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात आज उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

केज मतदारसंघातील शेतकऱ्यांना देण्यात येणारे अतिवृष्टी व शंखीरोगाचे अनुदान शेतकऱ्यांना अद्याप देण्यात आलेले नाही.तसेच तालुक्यातील ज्या मंडळाचा अनुदान वाटपासाठी समावेश नाही अशा सर्व मंडळाचा समावेश करण्यात यावा याबाबही आज निवेदन देण्यात आले.

यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे,माजीआमदार संजय दौंड, डॉ.नरेंद्र काळे, राजकिशोरज मोदी, राजपाल लोमटे, बबनजी लोमटे, अमर देशमुख, ताराचंद शिंदे, प्रमोद भोसले, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.