नागमठाण येथे 22 लक्ष 50 हजार रुपये खर्चाच्या दोन अंगणवाडी इमारतीचे भूमीपूजन

वैजापूर ,३ मार्च / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील नागमठाण येथे जिल्हा परिषदचे माजी सभापती अविनाश पाटील गलांडे यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा परिषदच्या एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या गावातील अंगणवाडीच्या दोन इमारतीचे ( क्रमांक एक व दोन)  रुपये 22 लक्ष 50 हजार रुपये ) बांधकामाचे भूमिपूजन अंगणवाडी बालविद्यार्थी  ईश्वरी ज्ञानेश्वर गिरी व  रुद्रा संतोष पगारे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.

याप्रसंगी सरपंच दत्तू काका खुरुद, बबन नाना गायके, भीमाशंकर तांबे, संजय गिरी, रावसाहेब ढेरंगे, मच्छिंद्र राशिनकर, रवी तांबे, मुख्याध्यापक पवार सर, अंगणवाडी सेविका विखेताई, वाढेताई, शासकीय गुत्तेदार निखिल तांबे, योगेश वाढे, जि.प.शिक्षक वृंद अंगणवाडी विद्यार्थी उपस्थित होते.अविनाश पाटील गलांडे यांनी दोन अंगणवाडी इमारत मंजूर केल्याबद्दल समस्त ग्रामस्थ व ग्रामपंचायतच्यावतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.