भाजप व्यापारी आघाडीचे वैजापूर तालुका पदाधिकारी नियुक्त ; जिल्हा सरचिटणीसपदी निलेश पारख

वैजापूर ,२१ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :-भाजप व्यापारी आघाडीच्या औरंगाबाद जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून, जिल्हा सरचिटणीसपदी वैजापूर येथील व्यापारी निलेश कुमार पारख यांची तर वैजापूर शहराध्यक्षपदी विनय संचेती यांची नियुक्ती करण्यात आली.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्याहस्ते शुक्रवारी नियुक्तीपत्र देण्यात आले.
औरंगाबाद जिल्ह्यातील भाजप व्यापारी संघटनेचे नवनियुक्त पदाधिकारी असे निलेशकुमार पारख (जिल्हा सरचिटणीस) शैलेश पोंदे (जिल्हा उपाध्यक्ष) धीरज बोथरा (चिटणीस) अभिजित साखरे (सदस्य) विनय संचेती (वैजापूर शहर अध्यक्ष) गिरीश चापारनेरकर महेश हिरण, रोशन संचेती (शहर उपाध्यक्ष) सन्मितसिंग खनिजो (सरचिटणीस) यासर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

याप्रसंगी भाजपचे प्रदेश सरचिटणीस इद्रिस मुलतानी, जिल्हाध्यक्ष विजय औताडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य एकनाथराव जाधव,जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी,भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद मंडलेचा, उद्योग आघाडीचे कैलास पवार,भाजचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत,बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप, नगरसेवक राजुसिंग राजपूत, डॉ.राजीव डोंगरे, शैलेश चव्हाण, गणेश खैरे,राजेश गायकवाड,जयमालाताई वाघ,शालिनी सोमाणी यांच्यासह व्यापारी व कार्यकर्ते उपस्थित होते.