कंट्रोल रूमला फोन आला आणि म्हणाला मुंबईत पुन्हा ९३ सारखे साखळी बॉम्बस्फोट होणार

मुंबई ,८ जानेवारी  / प्रतिनिधी :- आज सकाळी पोलीस कंट्रोल रूमवर एका अज्ञात इसमाचा फोन आला आणि त्याने मुंबईत पुन्हा एकदा १९९३ सारखे साखळी बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर संपूर्ण प्रशासन कमला लागले आणि दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) एका संशयित इसमाला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चोकशी करण्यात येत असून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही.

मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला आलेल्या फोनवर १९९३ प्रमाणे साखळी बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती. फोन करणाऱ्याने मुंबईत दोन महिन्यांनंतर माहिम, भेंडीबाजार, नागपाडा, मदनपुरा याठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचे सांगितले. तसेच, यासाठी बाहेरच्या राज्यातून लोकांना बॉम्ब ब्लास्ट आणि दंगली करण्यासाठी बोलावले असून यामध्ये एका काँग्रेस आमदाराचा हात असल्याचा दावादेखल करण्यात आला. यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण पोलीस विभागात खळबळ माजली होती. यासंदर्भात एटीएसला माहिती दिल्यानंतर २ पथके तयार करण्यात आली.