पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किटचे शनिवारी राजभवन येथे लोकार्पण – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

मुंबई ,६ जानेवारी  / प्रतिनिधी :- राज्यातील विविध पवित्र जैन तिर्थक्षेत्रांच्या सुरक्षा व सुविधांसाठी पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किटचे लोकार्पण उद्या शनिवार ७ जानेवारी रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुमुक्षरत्न श्री सेतुकभाई अनिलभाई शाह यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

राजभवन येथे सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. सटाना (जि. नाशिक) येथील श्री मांगी तुंगीजी दिगंबर जैन सिद्ध क्षेत्र देवस्थान, शहापूर (जि. ठाणे) येथील मानसमंदिर (शाहपूर जैन तीर्थ), साक्री (जि. धुळे) येथील श्री बलसाना श्वेतांबर जैन तीर्थ, पी. ओ.- बाहुबली (जि. कोल्हापूर) येथील श्री जगवल्लभ पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर, पी. ओ.- बाहुबली (जि. कोल्हापूर) येथील कुम्भोज बाहुबली जैन मंदिर, वणी (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील श्री अमिझरा शंखेश्वर पार्श्वाभ्युदय तीर्थ, पाबळ (ता. शिरुर, जि. पुणे) येथील पद्म आणि जैन तीर्थ, पायधुनी (मुंबई) येथील श्री गोडीजी पार्श्वनाथ तीर्थ, शिरपूर (ता. मालेगाव, जि. वाशिम) येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवान या तीर्थस्थळांचा या पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किटमध्ये समावेश आहे, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.