चांदेगाव येथे विविध विकास कामांचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश गलांडे यांच्या हस्ते भूमीपूजन


वैजापूर ,१ जानेवारी  / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील चांदेगाव येथे पंतप्रधान घरकुल आवास योजना व महात्मा गांधी रोजगार हमी योजना सिंचन विहीर कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे यांच्याहस्ते रविवारी(ता.01) करण्यात आले. 

या प्रसंगी जगन्नाथराव काळे, भीमाशंकर पाटील तांबे (विभाग प्रमुख), दत्तू पाटील खुरूद (सरपंच, नागमठाण), बाळासाहेब पाटील मापारी (सरपंच), दादासाहेब बोधक (उपसरपंच) बाबासाहेब पाटील पवार( ग्रामपंचायत.सदस्य),  साहेबराव बर्डे (ग्रामपंचायत सदस्य), सुनील पाटील काळे (माजी उप सरपंच), भगवान पाटील काळे (व्हा.चेअरमन), नाथा आबा खुरुद,  बबन पवार, ज्ञानेश्वर बर्डे, गोरख काळे,  भगवान धिवर, तुळशीराम बर्डे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते.