विहंगम योगाच्या सर्वोच्च विज्ञानाद्वारे समाधी अवस्थेच्या प्राप्तीने शब्द ब्रह्माचा अनुभव

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

“घराघरात स्वर्वेद,मनामनांत स्वर्वेद, जनमनांत स्वर्वेद”

आजचा दोहा

अनेक जन्म दुख मरण के, त्रास​ ​वासना लाग । 

अभिनिवेश ताको कहूॅं, सुनु​ नाशक अनुराग ।।२४९।।

परम विहंग समाधि में,  अनुभव​ ​शब्द प्रकाश । 

जीवन्मुक्ती होइ सो, पंच क्लेश ता​ ​नाश ।।२५०।।

(स्वर्वेद षष्ठ मण्डल षष्ठ अध्याय)०६/०६/२४९, २५०

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

अनेक जन्मांमध्ये अनुभवलेल्या जन्म- मृत्यूच्या यातनांचे भय जे आत्म्यामध्ये वर्तमान असते, त्यास अभिनिवेश  असे म्हणतात;  जे प्रेम-नाशक आहे. मृत्यूच्या भयाने कुठलाही प्राणी मरू इच्छित नाही. प्राकृतिक दु:खं असूनही त्याचे आपल्या शरीरावर प्रेम असते. म्हणून हे भय शुद्ध चेतन प्रेम नष्ट करणारे आहे. विहंगम योगाच्या सर्वोच्च विज्ञानाद्वारे  समाधी अवस्थेच्या प्राप्तीने शब्द ब्रह्माचा अनुभव होतो. त्यामुळे जीवन्मुक्त अवस्थेची  उपलब्धता होते,  जी सर्व क्लेशांना नष्ट करणारी आहे.

संदर्भ : स्वर्वेद 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org