विवेकी पुरुष मनाला सोडून आत्म्याच्या अनुकूल कार्ये करून आपले जीवन महान आणि यशस्वी बनवतात

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

“घराघरात स्वर्वेद,मनामनांत स्वर्वेद, जनमनांत स्वर्वेद”

आजचा दोहा 

मन प्रसन्न के कर्म में, माया बन्धन जान । 

सन्त विवेकी नहिं करें, करें जोमन नहिं मान ।।३३।।

(स्वर्वेद प्रथम मण्डल अष्टम अध्याय) ०१/०८/३३

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

विषयांचा रस घेऊन मन चिरकालापासून संसार सुख भोगत आहे. वारंवार ज्ञान आणि सत्संगाची चर्चा होऊनही ते आपल्या विषयासक्तीला सोडत नाही. म्हणून अध्यात्म-विद्येच्या अधिकारी जनांना सांगितले जाते की, मन प्रसन्न करणाऱ्या पतनशील कर्मांना करू नका. मनाची सर्व  शुभ-अशुभ कर्मे बंधनासाठी आहेत तसेच मनाची सर्व कार्ये मायेचे बंधन दृढ करतात. म्हणून अनुभवी विवेकी संत मनाने सांगितलेली कर्मे न करता अशी कर्मे करतात की जी मनाला स्वीकार्य नाहीत. मन आणि आत्म्याचा भेद जाणणारे विवेकी पुरुष मनाला सोडून आत्म्याच्या अनुकूल कार्ये करून आपले जीवन महान आणि यशस्वी बनवतात.

संदर्भ : स्वर्वेद 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org