कोविड-19 अपडेट:भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 653

नवी दिल्ली,३१ डिसेंबर /प्रतिनिधी :-देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसीच्या एकूण 220.10 कोटी मात्रा (95.13 कोटी दुसरी मात्रा आणि 22.40 कोटी खबरदारीची मात्रा) दिल्या.

गेल्या 24 तासांत 91,732 मात्रा दिल्या.

सध्या भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या 3,653 आहे.

उपचाराधीन कोरोनाबाधितांचा दर 0.01%

रुग्ण बरे होण्याचा दर 98.8%

गेल्या 24 तासांत 179 रूग्ण बरे झाले; आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 4,41,44,029.

गेल्या 24 तासांत 226 नव्या रुग्णांची नोंद झाली.

रूग्ण बाधीत होण्याचा दैनंदिन दर 0.12%

रुग्ण बाधीत होण्याचा साप्ताहिक दर 0.15%

आतापर्यंत केलेल्या एकूण कोविड चाचण्या  -91.07 कोटी; गेल्या 24 तासांत 1,87,983 चाचण्या करण्यात आल्या.