विद्यापीठ विकास मंचाचे संस्थाचालक गटाचे उमेदवार बसवराज मंगरुळे हे पहिल्या फेरीत प्रचंड मतांनी ​विजयी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ निवडणुक:अर्चना आडसकर,डॉक्टर वैशाली खापर्डे विजयी

औरंगाबाद,१३ डिसेंबर / प्रतिनिधी :-अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ निवडणुकीत संस्थाचालक गटाचे उमेदवार बसवराज मंगरुळे हे पहिल्या फेरीत प्रचंड मतांनी ​विजयी झाले. ​बसवराज मंगरुळे हे भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष आहेत.संस्थाचालक महिला गटामध्ये अर्चना आडसकर या बिनविरोध निवडून आल्या​. ​विद्यापीठ पीजी टीचर गटा मध्ये प्रोफेसर डॉक्टर वैशाली खापर्डे या विजयी झाल्या ,या वेळी विद्यापीठ विकास मंचाचे महाराष्ट्र सचिव प्रा.डॉ.गजानन सानप , राज्यपाल नियुक्त माजी सिनेट सदस्य नरहरी शिवपुरे ,पदवीधर गट सिनेट गट नवनियुक्त सिनेट सदस्य डॉ. योगिता तोर होके पाटील ,राज्यपाल नियुक्त माजी सिनेट सदस्य पंकज भारसाकळे , प्रा.डॉ .टी .आर. पाटील प्रा. डॉ.भगवानसिंग डोबाळ , डॉ.राम बुधवंत, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद माहानगर मंत्री ऋषिकेश केकान , महेंद्र मुंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.