उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ; घरातीलच माणसं शिंदे गटात सामील

एकनाथ शिंदे माझा सगळ्यात आवडीचा नेता : जयदेव ठाकरे

मुंबई ,५ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू जयदेव ठाकरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. बीकेसी येथे सुरू असलेल्या दसरा मेळाव्याला जयदेव ठाकरे उपस्थित दाखवली. यावेळी ते शिंदे गटात असल्याचेही त्यांनी सांगितले. निहार ठाकरेंनंतर आता जयदेव ठाकरेंनी शिंदे गटाची वाट धरली, त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू जयदेव ठाकरे यांनी यांनी उपस्थिती दर्शवली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतूक केले आहे.ठाकरे कुटूंबातील दोन महत्त्वाच्या व्यक्ती जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे शिंदे गटात सामील झाल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची ठेवण्यात आली होती त्याच बाजूला जयदेव ठाकरे यांना स्थान देण्यात आलं आहे. यावेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला.

दरम्यान, ते म्हणाले हा कष्टकऱ्यांचा, कामगारांचा नेता आहे. त्यामुळे आता सर्व बरखास्त करून पुन्हा निवडणुका होवूद्या हा एकटा नाथ होऊ नका… हा एकनाथचं राहू द्या… ही तुम्हा सर्वांना विनंती आहे, असे जयदेव ठाकरे म्हणाले. सर्व बर्खास्त करा, राज्यात पुन्हा निवडणुका घ्या…  राज्यात पुन्हा शिंदे राज्य येऊ द्या, असे जयदेव ठाकरे यावेळी म्हणाले. ते आज मुंबईत एकनाथ शिंदे यांनी आयोजीत केलेल्या दसरा मेळाव्यात बोलत होते.