वैजापूर न्यायालयात भारतीय संविधान उद्धेशिकेचे वाचन

वैजापूर, २६ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-वैजापूर तालुका विधी सेवा समिती व जिल्हा वकील संघ यांच्यावतीने वैजापूर न्यायालयात भारतीय संविधान दिनानानिमित्त संविधान उद्धेशिकेचे शनिवारी (ता.26) वाचन करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा न्यायाधीश एम. मोहियोधदीन एम.ए.यांच्या मार्गदर्शनाखाली व दुसरे तदर्थ जिल्हा न्यायाधीश आहेर, न्या. पी.पी. मुळे, दिवाणी न्यायाधीश आर. एम. नेर्लेकर, सह दिवाणी न्यायाधीश आर. एम. कराडे, न्या.श्रीमती आर.एम. मर्क, न्यायदंडाधिकारी श्रीमती एस.के.खान, न्या. श्रीमती व्हि.आर.कुलकर्णी, श्रीमती डी.एम.पवार,  वकील संघाचे अध्यक्ष अँड किरण त्रिभुवन व कार्यकारिणी सदस्य यांनी संविधान उधदेशिकाचे वाचन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले.

या प्रसंगी वकील संघाचे अँड प्रवीण एस.साखरे, अँड. नानासाहेब जगताप, अँड.प्रमोद जगताप, अँड.रियासतअली, अँड.सोपान पवार, अँड. प्रदीप बत्तासे, अँड राफे हसन, अँड.व्हि.जी.वाघ, सचिव वैभव ढगे, अँड. संतोष जेजुरकर, अँड. सचिन जानेफळकर, अँड. निखील हरिदास, अँड नुजहत बेगम, अँड. पडवळ, अँड. राहुल धनाड, अँड. संजय बत्तीसे, अँड. दत्तात्रय जाधव, अँड. मालपाणी, अँड. कटारे, न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वैजापूर येथील कदम महाविद्यालतात संविधान दिनानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर

वैजापूर शहरात कदम महाविद्यालय व वकील संघ वैजापूर  यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त शनिवारी (ता.26) कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.

वैजापूर जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. मोहियोद्दीन एम.ए. यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यायदंडाधिकारी श्रीमती डी.एम. पवार यांच्या अध्यक्षतेखाली कदम महाविद्यालय येथे आयोजित या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात  न्या.शडी.एम.पवार यांनी समान न्याय व कायदेविषयक माहिती दिली. महिला, 18 वर्ष पर्यंतची मुले, अनुसूचित जाती व जमाती मधील व्यक्ती, तुरुंगात असलेल्या व्यक्ती, औद्योगिक कामगार, दिव्यांग व्यक्ती, वार्षिक उत्पन्न 3 लाखांपर्यंत असलेल्या व्यक्ती या मोफत कायदेविषयक सहाय्यासाठी पात्र असून सेवा चे प्रकार विधी सहाय्य समिती मार्फत पुरविले जात असल्याचे प्रतिपादन केले. तसेच विद्यार्थी यांना शिक्षणाचा अधिकार याविषयीची माहिती दिली.

या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब कदम अँड व्हि. जी. वाघ, अँड. आर. डी. सिरसाठ यांनी घटनेने दिलेल्या अधिकार व कर्तव्याविषयी सविस्तर माहिती दिली. अँड. एन. आर. गायकवाड, अँड. संदीप डोंगरे, अँड. नुजहत बेगम, न्यायालयीन कर्मचारी बाबासाहेब मोरे आदींची यावेळी उपस्थिती होती. सुत्रसंचालन अँड. सोपान पवार यांनी केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.