ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी आशियाई श्रीमंतांच्या यादीत:हिंदुजा कुटुंब सलग आठव्यांदा अव्वल स्थानी

लंडन :- ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांचा ब्रिटनमधील ‘एशियन रिच लिस्ट २०२२’ मध्ये समावेश करण्यात आला आहे. सुनक आणि अक्षता मूर्ती यांची अंदाजे संपत्ती ७९० दशलक्ष असून ते यादीत १७ व्या क्रमांकावर आहेत.

हिंदुजा कुटुंबाने सलग आठव्यांदा या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यांची अंदाजे संपत्ती ३०.५ अब्ज पौंड आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ अब्ज पौंड जास्त आहे. लंडनचे महापौर सादिक खान यांनी नुकताच वेस्टमिन्स्टर पार्क प्लाझा हॉटेलमध्ये २४व्या वार्षिक एशियन बिझनेस पुरस्कार हा सोहळा पार पडला. या दरम्यान हिंदुजा ग्रुपचे सह-अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांची कन्या रितू छाब्रिया यांना ‘एशियन रिच लिस्ट २०२२’ ची प्रत दिली. ज्यामध्ये त्यांच्या नावाचा समावेश आहे.

ऋषी सुनक हे आधी बँकर आणि नंतर ते राजकारणी बनले. ते २१० वर्षांतील सर्वात तरुण ब्रिटनचे पंतप्रधान आहेत. ते ब्रिटनचे पहिले हिंदू पंतप्रधान आहेत. या वर्षीच्या आशियाई श्रीमंतांच्या यादीत ब्रिटनमध्ये १६ अब्जाधीश आहेत, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बहुतांश अब्जाधीशांच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे किंवा तशीच राहिली आहे.