नांदेडमध्ये 151 बाधितांची भर तर सहा जणांचा मृत्यू

नांदेड दि. 21 :- शुक्रवार 21 ऑगस्ट 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 44 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 151 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 74 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 77 बाधित आले.

आजच्या एकुण 861 अहवालापैकी 638 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 4 हजार 821 एवढी झाली असून यातील 2 हजार 847 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 771 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 136 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.

गुरुवार 20 ऑगस्ट रोजी वाजेगाव नांदेड येथील 41 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे व शुक्रवार 21 ऑगस्ट रोजी कैलासनगर नांदेड येथील 58 वर्षाच्या एका महिलेचा, कंधार तालुक्यातील नवीन मोंढा येथील 56 वर्षाचा एक पुरुष, चिखली खु. नांदेड येथील 66 वर्षाचा एक पुरुष व शक्तीनगर नांदेड येथील 68 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे तर गुरुद्वारा गेट नं. 4 बडपुरा नांदेड येथील 53 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्य झाला.

आज बरे झालेल्या 44 कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 18, देगलूर तालुक्यात 17, हदगाव तालुक्यात 5, मुखेड तालुक्यात 18, लातूर 1, नांदेड ग्रामीण 1, बिलोली तालुक्यात 1, नायगाव तालुक्यात 12, हिंगोली एक असे एकुण 74 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 27, बिलोली तालुक्यात 1, लोहा तालुक्यात 2, मुखेड तालुक्यात 9, मुदखेड तालुक्यात 2, उमरी तालुक्यात 15, अर्धापूर तालुक्यात 3, भोकर तालुक्यात 1, हदगाव तालुक्यात 1, कंधार तालुक्यात 9, धर्माबाद तालुक्यात 5, हिंगोली 2 असे एकुण 77 बाधित आढळले.

जिल्ह्यात 1 हजार 771 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीसर्वेक्षण- 1 लाख 50 हजार 227,घेतलेले स्वॅब- 33 हजार 303,निगेटिव्ह स्वॅब- 26 हजार 533,आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 151,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 4 हजार 821,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-10,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 49,एकूण मृत्यू संख्या- 168,एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 2 हजार 847,रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 771,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 270, आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 136.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *