हिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 19 रुग्ण; 304 रुग्णांवर उपचार सुरु

हिंगोली,दि.21: जिल्ह्यात आज 19 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार हिंगोली परिसरातील 7 व्यक्ती, औंढा नागनाथ परिसर 3 व्यक्ती तर कळमनुरी परिसरातील 1 व्यक्ती असे एकूण 11 व्यक्ती रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे तर हिंगोली परिसरातील 3 व्यक्ती, कळमनुरी परिसरातील 4 व्यक्ती, वसमत शहरातील 1 व्यक्ती असे एकूण 8 व्यक्ती आरटीपीसीआर टेस्टद्वारे कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच आज 94 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 13 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 3 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 16 रुग्णांची सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 1 हजार 286 रुग्ण झाले असून, त्यापैकी 967 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 304 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोवीड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 15 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक किशोरप्रसाद श्रीवास यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *